Corona Virus : शहरात २० तर ग्रामीणमध्ये ८० कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 01:04 PM2021-06-17T13:04:18+5:302021-06-17T13:08:01+5:30

जिल्ह्यात उपचार पूर्ण झाल्यानंतर २५२ रुग्णांना सुटी देण्यात आली

Corona virus: 20 in urban areas and 80 in rural areas | Corona Virus : शहरात २० तर ग्रामीणमध्ये ८० कोरोनाबाधितांची भर

Corona Virus : शहरात २० तर ग्रामीणमध्ये ८० कोरोनाबाधितांची भर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या १२८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेतउपचारादरम्यान ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला

औरंगाबाद : जिल्ह्यात १०० कोरोनाबाधितांची भर पडली, तर ५ बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात २५२ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील १९, तर ग्रामीण भागातील २३३ जण घरी परतले असून १२८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ००८ झाली आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३६६ जण कोरोनामुक्त झाले आहे, तर उपचारादरम्यान आतापर्यंत ३३६१ जणांचा मृत्यू झाल्याने १२८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले.

मनपा हद्दीत २० रुग्ण
नाईक नगर बीड बायपास २, जुना बाजार १, नारेगाव १, मयुर पार्क १, अशोक नगर १, विशाल नगर १, मथुरा नगर १, स्नेह नगर १, नेहरू नगर १, एकता नगर १, कांचनवाडी १, अन्य ८.

ग्रामीण भागात ८० रुग्ण
तालुकानिहाय औरंगाबाद ६, फुलंब्री ७, गंगापूर २४, कन्नड १२, सिल्लोड २, वैजापूर २१, पैठण ७, सोयगाव येथे १ रुग्ण आढळून आला.

पाच बाधितांचा मृत्यू
घाटीत उपचारादरम्यान पडेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७२ वर्षीय महिला, जायकवाडी उत्तर पैठण येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात शिवाजी हायस्कूल परिसरातील ४६ वर्षीय पुरुष, हाऊसिंग सोसायटी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Corona virus: 20 in urban areas and 80 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.