Corona In Aurangabad : जिल्ह्यात १२७ कोरोनाबाधित रुग्णांची भर, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 07:16 PM2020-07-16T19:16:58+5:302020-07-16T19:17:51+5:30

सध्या ३६९९ जणांवर उपचार सुरु आहेत.

Corona In Aurangabad: 127 corona patients in the district, 3 deaths | Corona In Aurangabad : जिल्ह्यात १२७ कोरोनाबाधित रुग्णांची भर, ३ मृत्यू

Corona In Aurangabad : जिल्ह्यात १२७ कोरोनाबाधित रुग्णांची भर, ३ मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १००५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल सकाळी तर दुपारच्या सत्रात ६१ रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ९५७१ कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी ५४९९ बरे झाले, ३७३ बधितांचा मृत्यू झाला. सध्या ३६९९ जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिली.

अँटीजेन टेस्टमध्ये आढळले १७ रुग्ण 
यामध्ये मोबाईल टीमने केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ३, तर शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह असे एकूण १७ बाधीत आढळले आहेत. 

बाधित तिघांचा मृत्यू
कोरोनाबाधीत तिघांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रांजणगाव येथील ५० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुष तर बजाज नगर येथील अयोध्या नगरच्या ५८ वर्षीय पुरूष बाधीत रुग्णाचा मृतात समावेश आहे. आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा ३७३ झाला आहे

मनपा हद्दीतील ५६ रुग्ण 
न्याय नगर, गारखेडा १, संसार नगर १, कांचनवाडी १, छावणी १, एन बारा सिडको १, पीर बाजार उस्मानपुरा १, एन चार सिडको २, बेगमपुरा ३, प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड १, अन्य १, एन अकरा हडको ३,चिकलठाणा १, जय भवानी नगर १, पीर बाजार १, शिव नगर १, मिल कॉर्नर १, एन सात सिडको २, उल्का नगरी १, पडेगाव ३ , बीड बायपास १, सातारा परिसर २, क्रांती नगर १, उस्मानपुरा १, होनाजी नगर ३, हमालवाडा १०, प्रताप नगर २, केशरसिंगपुरा ५, नारळीबाग २, विजय चौक गारखेडा २

ग्रामीण भागातील ५४ रुग्ण 
रांजणगाव २, पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर १, अक्षदपार्क,कुंभेफळ १, करमाड १, मोठी आळी, खुलताबाद ३, पळसवाडी, खुलताबाद ६, वेरूळ २, मोरे चौक, बजाज नगर २, आयोध्या नगर, बजाज नगर ४, राधाकृष्ण सो., तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, जय भवानी चौक, बजाज नगर २, गोंडेगाव, सोयगाव २, शास्त्री नगर, वैजापूर १, गोंदेगाव, सोयगाव २, मोरे चौक ३, वडगाव, साईनगर, बजाज नगर ३, सरस्वती सो., बजाज नगर २, बजाज नगर १, पियूष विहार, आनंद जनसागर, बजाज नगर १, पारिजात नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, सिडको महानगर १, एमआयडीसी  पोलिस स्टेशन परिसर, वाळूज १, सातारा  परिसर १, वाळूज १, अज्वा नगर, वाळूज २, अजिंक्यतारा सो., वाळूज ३, संघर्ष नगर, घाणेगाव १ बाधित आढळून आले.

Web Title: Corona In Aurangabad: 127 corona patients in the district, 3 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.