आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिलासा; खंडपीठात अपिलामध्ये मिळाला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 07:59 PM2021-06-22T19:59:07+5:302021-06-22T20:01:03+5:30

MLA Pradip Jaiswal got bail दोन्ही कलमांखाली प्रत्येकी सहा महिने साधा कारावास आणि एकूण पाच हजार रुपये दंड ठोठावला होता.

Consolation to MLA Pradip Jaiswal; Bail was granted on appeal in the Aurnagabad bench | आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिलासा; खंडपीठात अपिलामध्ये मिळाला जामीन

आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिलासा; खंडपीठात अपिलामध्ये मिळाला जामीन

Next
ठळक मुद्देपोलीस ठाण्यात जाऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या शिक्षेपासून दिलासा

औरंगाबाद : शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट यांनी निलंबित करून १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. (MLA Pradip Jaiswal got bail )

पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आणि धमकी दिल्याच्या गुन्ह्यात आमदार जैस्वाल यांना सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरुद्ध् त्यांनी ॲड. देवांग राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत खंडपीठात अपील दाखल केले आहे.

२० मे २०१८ च्या रात्री झालेल्या घटनेनंतर जैस्वाल यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याच्या सुनावणीअंती सत्र न्यायालयाने जैस्वाल यांना भादंवि कलम ३५३ आणि ५०६ खाली दोषी ठरवून दोन्ही कलमांखाली प्रत्येकी सहा महिने साधा कारावास आणि एकूण पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. खंडपीठात ॲड. देवांग देशमुख यांच्याकरिता ॲड. गोविंद कुलकर्णी यांनी बाजू मांडली. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

Web Title: Consolation to MLA Pradip Jaiswal; Bail was granted on appeal in the Aurnagabad bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app