आता वाहतूक कोंडीला बायबाय, सोलापूर-धुळे नवीन बायपास आजपासून सुसाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 12:50 PM2021-12-24T12:50:29+5:302021-12-24T12:53:52+5:30

३० कि.मी.च्या अंतरातून जड वाहतूक धावत असल्यामुळे सध्याच बायपासवरील जड वाहने कमी झाली आहेत.

Bye bye to the traffic jam ! New Solapur-Dhule bypass opens from today | आता वाहतूक कोंडीला बायबाय, सोलापूर-धुळे नवीन बायपास आजपासून सुसाट !

आता वाहतूक कोंडीला बायबाय, सोलापूर-धुळे नवीन बायपास आजपासून सुसाट !

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद : सोलापूर ते औरंगाबादमार्गे धुळे हा एनएच २११ अंतर्गत शहराबाहेरून जाणारा महामार्ग २४ डिसेंबरपासून सर्व स्तराच्या वाहतुकीसाठी खुला होणार आहे (New Solapur-Dhule bypass opens from today) . वाहतुकीची कुठलीही कोंडी नसणारा महामार्ग अप्रतिम प्रवासाचा अनुभव देणारा ठरणार आहे. तीन वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर चाचणीसाठी मागील १५ दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला हाेता. अधिकृतरित्या शुक्रवारपासून चौपदरी महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी औपचारिकरीत्या खुला होत असल्याचे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी कळविले.

देवळाई-सातारा, कांचनवाडी, तीसगावलगत हा महामार्ग जातो. बीड बायपासवरील जड वाहतूक आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. २१ डिसेंबर रोजी पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर टोलदर निश्चित करण्यात आला आहे. ३० कि.मी.च्या अंतरात १ पूल आहे. २ पूल नव्याने बांधले आहेत. १० ठिकाणी सर्व्हिस रोड आहेत. ८ अंडरपास आहेत. ४ पादचारी मार्ग, जनावरांसाठी १ मार्ग, २ जंक्शन्स या अंतरात आहेत. यात कुठेही रेल्वे ओव्हरब्रिज नाही.

करोडीजवळ असेल टोल नाका
३० कि.मी. अंतरासाठी करोडीजवळ टोलनाका असणार आहे. तेथून पुढे तेलवाडी ते कन्नडमार्गे रस्त्याचे काम झाले आहे. चाळीसगाव घाटापलीकडेही काम सुरू झाले आहे. औट्रम घाट वगळता उर्वरित काम एका वर्षात पूर्ण होईल. असे प्रकल्प संचालक काळे यांनी सांगितले.

बीड बायपासवरील वाहतूक होणार कमी
बीड बायपासवरील वाहतूक कमी होणार आहे. ३० कि.मी.च्या अंतरातून जड वाहतूक धावत असल्यामुळे सध्याच बायपासवरील जड वाहने कमी झाली आहेत. येणाऱ्या काळात हे प्रमाण आणखी कमी होईल.

औरंगाबादपासून असा आहे महामार्ग
लांबी : ३० कि.मी.
योजना : भारतमाला
निधी कशातून : ईपीसी
कंत्राटदार कंपनी : एल ॲण्ड टी

अभियंता संस्था : सातारा इन्फ्रा, कन्सल्टिंग इंजि, सुगम टेक्नो.
प्रकल्प खर्च : ५१२ कोटी
बांधकाम कालावधी : ९१० दिवस
कंत्राट कालावधी : अडीच वर्षे
काम सुरू झाले : जानेवारी २०१८
काम संपले : २०२१

वाहनांना एकदा जाताना असा लागेल टोल
कार, जीप- ६० रुपये
एलएमव्ही,मिनी बस- ९५ रुपये
बस, ट्रक- १९५ रुपये
व्यावसायिक वाहन- २१५ रुपये
एचसीएम वाहन- ३०५ रुपये
ओव्हरसाईज वाहन- ३७० रुपये

Web Title: Bye bye to the traffic jam ! New Solapur-Dhule bypass opens from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.