Aurangabad Municipal Elections: Constituency-wise groups formed in Shiv Sena activist for candidacy? | औरंगाबाद महापालिका निवडणूक : उमेदवारीसाठी शिवसेनेत मतदारसंघनिहाय गट निर्माण?
औरंगाबाद महापालिका निवडणूक : उमेदवारीसाठी शिवसेनेत मतदारसंघनिहाय गट निर्माण?

ठळक मुद्देप्रभाग रचनेबाबत पदाधिकारी अनभिज्ञशिवसेनेत गटबाजी होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीला अजून साडेचार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पहिल्यांदाच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्यामुळे उत्सुकता आहे. इच्छुकांत उमेदवारीसाठी आतापासूनच मतदारसंघनिहाय गटबाजी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळण्याचे निकष काय असतील त्याबाबत अजून तरी काही धोरण ठरलेले नाही. मात्र, इच्छुकांनी नेत्यांची मर्जी राखण्यास सुरुवात केल्याने अनेकांची धावपळ होत असल्याचे दिसते आहे.  

औरंगाबाद शहरातील चार विधानसभा मतदारसंघांचा भाग महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामध्ये औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे. फु लंब्री, औरंगाबाद पूर्व मतदारसंघांत शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाही, त्यामुळे संघटनेतील पदाधिकारीच त्या मतदारसंघात आपल्या मर्जीतील उमेदवार पालिकेत देतील, परंतु संघटनेतील कोणत्या पदाधिकाऱ्याकडे जाऊन लॉबिंग करण्यापेक्षा आमदारांच्या मागे-पुढे करण्यास इच्छुकांनी सुरुवात केली आहे. संघटनेतील पदाधिकारी स्वत:कडे मतदारसंघातील उमेदवार आणि निवडणूक रणनीती आखण्याची जबाबदारी मागत असले तरी त्यांच्याकडे तशी जबाबदारी देण्याबाबत नेते, लोकप्रतिनिधींनी काहीही विचार केलेला नाही. पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. त्या मतदारसंघातील उमेदवारीवर त्यांचा शहराध्यक्षाला प्रचंड महत्त्व असणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

शहराध्यक्ष पद हे पक्षातील निष्ठावंत व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा भाजपतील काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निष्ठावंत आणि इतर पक्षातून भाजपात आलेल्यांमध्ये गटबाजी होण्याची शक्यता आहे.पगडा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे इच्छुकांनी पश्चिममधील नेतृत्वाकडे आतापासूनच हेलपाटे मारण्यास सुरुवात केली आहे. छोटेखानी समारंभातदेखील इच्छुकांचा ताफा आमदारांच्या मागे-पुढे फिरतो आहे. मध्य मतदारसंघातील प्रभागातील इच्छुक आमदारांमागे लॉबिंग करीत आहेत, तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन जिल्हा प्रमुखांकडे लिंक लाऊन बसलेले अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेना नेत्यांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची जाणीव अनेकांना होऊ लागल्यामुळे इच्छुकांनी आमदार आणि जिल्हा प्रमुखांची मनधरणी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसते आहे. ही अशी गटबाजी शिवसेनेत होण्याची शक्यता आहे. 

प्रभाग रचनेबाबत पदाधिकारी अनभिज्ञ
प्रभाग रचनेबाबत शिवसेनेतील संघटन पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे आक्षेप नोंदवून हस्तक्षेप करण्याची मागणी केली. उमेदवार ठरविताना लोकप्रतिनिधीच सगळे काही निश्चित करणार असतील तर संघटन पदाधिकाऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.प्रभाग रचनेत प्रशासनाने काय केले आहे, याची कोणतीही माहिती पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांना नाही. लोकप्रतिनिधींनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांना आहे; परंतु पदाधिकाऱ्यांच्या मागणीला स्थानिक लोकप्रतिनिधी काहीही दाद देत नसल्याची माहिती सेनेच्या गोटातून समजली आहे. 

Web Title: Aurangabad Municipal Elections: Constituency-wise groups formed in Shiv Sena activist for candidacy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.