औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी ९५ रुग्णांची वाढ, ६६ रुग्णांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:17 PM2020-12-02T13:17:44+5:302020-12-02T13:19:00+5:30

जिल्ह्यात १,०१८ रुग्णांवर सुरू उपचार 

Aurangabad district saw an increase of 95 patients on Tuesday, with 66 patients on leave | औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी ९५ रुग्णांची वाढ, ६६ रुग्णांना सुटी

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी ९५ रुग्णांची वाढ, ६६ रुग्णांना सुटी

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू  जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,४७३ एवढी झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या ९५ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या ६६ रुग्णांना सुटी देण्यात आली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,४७३ एवढी झाली आहे. यातील ४१,३०६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर १,१४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९५ रुग्णांत मनपा हद्दीतील ८३, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५९ आणि ग्रामीण भागातील ७ अशा ६६ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. बरकतपूर (ता.कन्नड) येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रूग्ण
रेल्वेस्टेशन परिसर १०, कमलनयन बजाज हॉस्पिटल परिसर १, गारखेडा परिसर ७, जवाहरनगर पोलीस स्टेशन परिसर १, शहागंज परिसर १, अंगुरीबाग १, साई परिसर १, एन सात बजरंग कॉलनी २, गजानन नगर, गारखेडा परिसर २, शिवाजी नगर १, अथर्व क्लासिक १, देवानगरी १, दशमेश नगर १, सातारा परिसर ३, गजानन कॉलनी १, देवळाई चौक परिसर ३, हनुमान नगर १, उत्तम नगरी, चिकलठाणा १, विमानतळ परिसर १, अलोक नगर, सातारा परिसर १, अहिंसा नगर १, कोटला कॉलनी १, जवाहर कॉलनी, विष्णू नगर ३, नवनाथ नगर १, आनंदवन सो., १, हडको एन बारा १, नारेगाव गल्ली १, एमएचबी कॉलनी, चंपा चौक १, ज्योती नगर १, एन सात सिडको १, जुना मोंढा, ढोलपुरा १, पारिजात नगर, एन चार सिडको १, सिडको १, ज्युबली पार्क १,  सन्मित्र कॉलनी १, झाल्टा फाटा १, सारा  सिटी पैठण रोड १, सुधाकर नगर १ व अन्य २२.

ग्रामीण भागातील रुग्ण : रांजणगाव शेणपुजी १, नेवपूर, कन्नड १, सरस्वती कॉलनी, गेवराई १, जिवराग टाकळी १, रांजणगाव १, अन्य ७.

८९७ नागरिकांची तपासणी
महापालिकेने मंगळवारी ८९७ नागरिकांची  टेस्ट केली. २२७ अँटिजन मधून २९ बाधित आढळले. आरटीपीसी-आर ६७०  टेस्ट केल्या.  

Web Title: Aurangabad district saw an increase of 95 patients on Tuesday, with 66 patients on leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.