In Aurangabad, 850 active corona patients are undergoing treatment | औरंगाबादेत कोरोनाच्या सक्रिय ८५० रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबादेत कोरोनाच्या सक्रिय ८५० रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देगुरुवारी 157 बाधितांची भर, 4 जणांचा मृत्यू, 126 रुग्णांना सुटीआतापर्यंत जिल्ह्यात ४२ हजार ९१४ बाधित आढळून आले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात १५७ नव्या बाधितांची भर पडली, तर चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १२६ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने विविध रुग्णालयांतून त्यांना सुटी देण्यात आली. यात शहरातील १११, तर ग्रामीणमधील १५ जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ४२ हजार ९१४ बाधित आढळून आले. त्यापैकी ४० हजार ९१६ जणांचे उपचार पूर्ण होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १,१४२ जणांचा मृत्यू झाल्याने ८५० बाधितांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीत १२७ रुग्ण
नाईकनगर १,  रेणुकापुरम कॉलनी, सातारा परिसर १, कासलीवाल प्रांगण, गारखेडा १, सराफा रोड, शाहगंज १, संघर्षनगर, मुकुंदवाडी १, संसारनगर, क्रांतीचौक १,  जय कॉलनी लक्ष्मी परिसर १, भानुदासनगर १,  शाहनूरवाडी १,  कैलासनगर  १,  एन-९ ज्ञानेश्वरनगर, हडको १,  कोटला कॉलनी १, एलआयसी डिव्हिजन ऑफिस १,   मुथियान रेसिडेन्सी, दीपनगर १, देवगिरी व्हॅली, मिटमिटा २, जसवंतपुरा १, गारखेडा २, चिकलठाणा-१, एन-२ सिडको १, जाधववाडी १, सातारा परिसर १, अलंकार सोसायटी १, उल्कानगरी १, भगतसिंग कॉलनी १,  एन-६ सिडको ४, शास्त्रीनगर २, बजरंग चौक १, बीड बायपास परिसर १,  चंद्रगुप्तनगरी १,  हरिकृपानगर २, पवननगर १, स्वामी विवेकानंदनगर १,  शिवाजीनगर २,  भगतसिंगनगर, हर्सूल १,  नॅशनल कॉलनी १,  एन-६ सिडको ५,   मयूरपार्क हर्सूल १,   एन-८ शिवदत्त हौ.सो १,   एन-५ सावरकरनगर १, आविष्कार कॉलनी, एन-६ येथे १, आकाशवाणी मैत्रनगर १,  एन-९ सिडको १, भडकलगेट १, जटवाडा रोड परिसर १, घाटी परिसर १, अन्य ७०.        

ग्रामीण भागात ३० रुग्ण
रांजणगाव एमआयडीसी ३, बजाजनगर १, रांजणगाव १, एमआयडीसी वाळूज ३, माळीवाडा १, ढोरकीन १, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, पैठण रोड परिसर १, पालोद १, अन्य १६ बाधित आढळून आले.                              

मृतात ३ महिला, १ पुरूष
घाटीत प्रतापगडनगरातील ७३ वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात लासूर स्टेशन येथील ६६ वर्षीय महिला, समर्थनगरातील ५१ वर्षीय महिला, उस्मानपुऱ्यातील ८४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: In Aurangabad, 850 active corona patients are undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.