घात की अपघात ? पोखरी शिवारातील 'तो' मृतदेह नगरच्या तरुणाचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 04:30 PM2021-10-20T16:30:00+5:302021-10-20T16:30:58+5:30

नगर- बीड राष्ट्रीय महामार्गावरील पोखरी येथील घटना 

Accident? The body of a young man from Pokhari Shivara is belong to Ahmadnagar | घात की अपघात ? पोखरी शिवारातील 'तो' मृतदेह नगरच्या तरुणाचा 

घात की अपघात ? पोखरी शिवारातील 'तो' मृतदेह नगरच्या तरुणाचा 

Next
ठळक मुद्देशवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा

कडा ( बीड ) : पोखरी शिवारात सोमवारी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह अहमदनगर येथील शेखर उर्फ रमेश पुजारी याचा आहे. त्याच्या मृत्यूचे सत्य हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार असून पुढील तपास सुरु आहे. 

आष्टी तालुक्यातील नगर-कडा- जामखेड- बीड राष्ट्रीय महामार्गावरील पोखरी शिवारात सोमवारी सकाळी जीन्स, पांढरा शर्ट, डाव्या कानाला जुनी जखम असलेला ३५  वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी नागरिकांना अधिक माहिती देण्याचे आवाहन केले होते. आज त्याची ओळख पटली आहे. शेखर उर्फ रमेश पुजारी असे मृताचे नाव आहे. तो अहमदनगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, मृतदेह अंबाजोगाई येथील रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पुजारीचा घात की अपघातात मृत्यू झाला याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतरच समजेल अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी दिली.

खळबळजनक ! पोखरी परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Web Title: Accident? The body of a young man from Pokhari Shivara is belong to Ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app