पदवीधर निवडणुकीत १० जणांची माघार; एकूण ३५ उमेदवारांमध्ये होणार लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 01:42 PM2020-11-18T13:42:42+5:302020-11-18T13:51:12+5:30

भाजपचे बीड येथील रमेश पोकळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

10 candidates withdraw in graduate elections; A total of 35 candidates will contest | पदवीधर निवडणुकीत १० जणांची माघार; एकूण ३५ उमेदवारांमध्ये होणार लढत

पदवीधर निवडणुकीत १० जणांची माघार; एकूण ३५ उमेदवारांमध्ये होणार लढत

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपचे जयसिंग गायकवाड यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सोमवारी ( दि. १७ ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे आता ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. असे असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यातच मुख्य लढत होणार असेच चित्र आहे.

निवडणुकीसाठी एकूण ४५ उमेदवारी अर्ज वैध ठरली होती. यातील १० उमेदवारांनी माघार घेतली आहे. सलग दोन वेळेस या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारे आ. सतीश चव्हाण यांची उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केल्यानंतरही भाजपला उमेदवार निवडण्यात वेळ लागला. शिरीष बोराळकर यांना तिकीट जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरी दिसून आली. प्रवीण घुगे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला मात्र रमेश पोकळे आणि भाजपचे जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र ते पक्षावर नाराज असून त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याचेही जाहीर केले आहे. यासोबतच भाजपचे बीड येथील रमेश पोकळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

अर्ज मागे घेतलेल्या १० उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे : 
अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद, ईश्वर आनंदराव मुंडे, बीड, अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद, जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद, प्रविणकुमार विष्णु पोटभरे, बीड, विजेंद्र राधाकिसन सुरासे, जालना, विवेकानंद शशीकांत उजळंबकर, लातूर, शेख गुलाम रसुल कठ्ठु, औरंगाबाद, संजय शहाजी गंभीरे ,बीड, संदिप बाबुराव कराळे, नांदेड.

या दहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात  एकूण ३३ उमेदवार आहेत : 
सतीश भानुदासराव चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) औरंगाबाद, बोराळकर शिरीष (भाजप) औरंगाबाद, अब्दुल रऊफ (समाजवादी पार्टी) औरंगाबाद, पोकळे रमेश शिवदास (अपक्ष) बीड, अंकुशराव शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर, कुणाल गौतम खरात (एमआयएम) औरंगाबाद, ढवळे सचिन राजाराम (प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद, प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (वंचित बहुजन आघाडी) परभणी, ) डॉ.रोहित शिवराम बोरकर (आम आदमी पार्टी) पुणे, शे.सलीम शे.इब्राहिम (वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी, सचिन अशोक निकम (रिपब्लिकन सेना) औरंगाबाद, अशोक विठ्ठल सोनवणे (अपक्ष ) औरंगाबाद, ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ‘ के.सागर ‘ (अपक्ष ) नांदेड, आशिष आशोक देशमुख (अपक्ष) बीड, उत्तम बाबुराव बनसोडे (अपक्ष) नांदेड, काजी तसलीम निजामोद्दीन (अपक्ष) उस्मानाबाद, कृष्णा दादाराव डोईफोडे (अपक्ष) औरंगाबाद, ॲड.गणेश नवनाथ करांडे (अपक्ष) बीड, घाडगे राणी रवींद्र (अपक्ष) बीड, दिलीप हरिभाऊ घुगे (अपक्ष), हिंगोली, भारत आसाराम फुलारे (अपक्ष) औरंगाबाद, ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (अपक्ष) परभणी, रमेश साहेबराव कदम (अपक्ष) नांदेड, राम गंगाराम आत्राम (अपक्ष) लातूर, वसंत संभाजी भालेराव (अपक्ष) औरंगाबाद, विलास बन्सीधर तांगडे (अपक्ष) जालना, डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (अपक्ष) औरंगाबाद, विशाल उध्दव नांदरकर (अपक्ष) औरंगाबाद, ॲड.शरद बहिणाजी कांबळे (अपक्ष) बीड, ॲड.शहादेव जानू भंडारे (अपक्ष) बीड, ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (अपक्ष) बीड, शेख हाज्जू हुसेन पटेल (अपक्ष) औरंगाबाद, समदानी चॉदसाब शेख (अपक्ष) नांदेड, सिध्देश्वर आत्माराम मुंडे (अपक्ष) बीड, संजय तायडे (अपक्ष) औरंगाबाद.

Web Title: 10 candidates withdraw in graduate elections; A total of 35 candidates will contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.