Asian Games 2018: एकाच स्पर्धेत भारताच्या मनजितला सुवर्ण, तर जॉन्सनला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 18:26 IST2018-08-28T18:26:07+5:302018-08-28T18:26:40+5:30
Asian Games 2018: भारताला 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजित सिंगने सुवर्णपदक जिंकवून दिले.

Asian Games 2018: एकाच स्पर्धेत भारताच्या मनजितला सुवर्ण, तर जॉन्सनला रौप्यपदक
ठळक मुद्देभारताच्या जिन्सन जॉन्सनने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताला 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजित सिंगने सुवर्णपदक जिंकवून दिले. भारतासाठी अजून एक आनंदाची बाब म्हणजे या स्पर्धेतील रौप्यपदकही आपल्याला मिळाले आहे. भारताच्या जिन्सन जॉन्सनने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
India's Manjit Singh wins gold medal, and Jinson Johnson wins silver medal in men's 800 metres finals. #AsianGames2018pic.twitter.com/sp4be6ujcO
— ANI (@ANI) August 28, 2018
पुरुषांच्या 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत मनजितने सुवर्णपदक पटकावताना हे अंतर 1:46.15 मिनिटांमध्ये पूर्ण केले. हे अंतर कापण्यासाठी भारताच्या जॉन्सनला 1:46.35 एवढी मिनिटे लागली.