शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी दत्तक घेणार झेडपीच्या शाळा

By admin | Updated: February 26, 2016 23:59 IST

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण आणि मराठी शाळांचा घसरलेला दर्जा तसेच मराठी शाळांबद्दल पालकांची बदललेली ...

निर्णय : शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट्य, नव्या शैक्षणिक सत्रात बदल जितेंद्र दखने अमरावतीइंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण आणि मराठी शाळांचा घसरलेला दर्जा तसेच मराठी शाळांबद्दल पालकांची बदललेली मानसिकता यावर पर्याय म्हणून लोकप्रतिनिधींना झेडपीच्या शाळा दत्तक घ्याव्या लागणार आहेत. या शाळांच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेऊन ही ‘दत्तक योजना’ राबविली जाईल.योजनेंतर्गत जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांना काही शाळा दत्तक घ्याव्या लागतील. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना राज्य शिक्षण आयुक्तांनी याबाबत पत्र दिले आहे. लोकप्रतिनिधींसाठी दत्तक शाळांची निवड करुन एप्रिल २०१६ पर्यंत या शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट असेल. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ६०१ शाळा आहेत. तुलनेत इंग्रजी शाळांची संख्या अत्यल्प आहे. मात्र दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने समसमान आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. तीन हजार लोकसंख्येच्या गावातही इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. पालक देखील मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठविण्यासाठी आग्रही आहेत. परिणामी मराठी माध्यमाच्या शाळांतील प्रवेशसंख्या रोडावली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी ‘शाळा दत्तक योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सकारात्मक बदल होण्याची चिन्हे आहेत. लोकप्रतिनिधींवर शाळांच्या विकासाची व त्यांचा दर्जा वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने या शाळांच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधींना तसा अहवालही वरिष्ठांना पाठवावा लागेल.