शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या सावटात ‘झेडपी’ ई-लर्निंग

By admin | Updated: August 14, 2014 23:29 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या गुणवत्तेत वाढ करणाऱ्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेला ‘ई-लर्निंग’ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या गुणवत्तेत वाढ करणाऱ्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेला ‘ई-लर्निंग’ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता असतानाही शाळांना सॉफ्टवेअर वाटपांच्या निविदांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या प्रक्रियेस बराच वेळ लागणार असल्याने निधी मिळूनही सुमारे शंभरहून अधिक शाळांत ई-लर्निंग प्रकल्प सुरू होण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. मुलाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी व शाळातील घटती पटसंख्या रोखण्यासाठी झेडपीकडून सध्या नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. कृतीयुक्त अध्ययन ‘ई-लर्निंग’ शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रम मुलांना मोफत गणवेश वाटप यासारख्या योजना निश्चित केल्या आहेत. योजनांच्या अंमलबजावणीला मात्र पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचा फटका बसत आहे. ई-लर्निंग उपक्रमांतर्गत पूर्वी निवडक शाळांना सॉफ्टवेअर दिले होते परंतु त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने निधी न दिल्याने कामकाज बंद पडले होते. या समस्येवर मार्ग शोधत झेडपीनेच पुढाकार घेत लाखोंचा निधी उभारून कामास गती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शाळांना सॉफ्टवेअर वाटप करण्यासाठी शिक्षण विभागाने निविदा मागविल्या होत्या. निविदांची छाननी करण्यात येऊन शाळांना सॉफ्टवेअर तत्काळ मिळतील, अशी अपेक्षा असतानाच ढिसाळ नियोजनामुळे निविदांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. येत्या काही दिवसात निविदांना मंजुरी मिळण्याचीही शक्यता कमीच आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या आत मंजुरी मिळाली नाही तर किमान दोन ते तीन महिने काहीच करता येणे शक्य होणार नाही. कोणत्या शाळांना सॉफ्टवेअर वाटप करायचे हेही निश्चित झालेले नाही, सदस्यांच्याही शिफारशी विचारात घेतलेल्या नाहीत. शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले नाही.