शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

तिवस्यात ‘झेंडूबाम’ आंदोलन

By admin | Updated: September 8, 2016 00:13 IST

येथील बसस्थानकातील अस्वच्छता व त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, नागपूरला जाणाऱ्या विनाथांबा फेऱ्यांमुळे कमी झालेले...

निषेध : विनाथांबा बसफेऱ्या बंद करातिवसा : येथील बसस्थानकातील अस्वच्छता व त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, नागपूरला जाणाऱ्या विनाथांबा फेऱ्यांमुळे कमी झालेले नियमित सेड्यूल याचा निषेध बुधवारी करण्यात आला. तिवसा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष वैभव वानखडे आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘झेंडू बाम’ आंदोलन केले. यावेळी बसस्थानक प्रमुख व प्रवाशांना ‘झेंडू बाम’चे वाटप करण्यात आले. या आगळ्यावेगळा आंदोलनाची तिवस्यात जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रीय महामार्गावर तिवसा हे तालुक्याचे मुख्यालय असतानाही येथे आगार न करता बसस्थानक आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना बसफेऱ्या नाहीत. विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. बसस्थानक व परिसराची नियमित सफाई होत नाही. सुरक्षा रक्षकाचा अभाव असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच सायंकाळनंतर येथे प्रवाशांचा सदैव जीव धोक्यात राहतो. रात्री अंधाराचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार येथे सुरू राहतात. एसटी महामंडळाविरुद्ध आंदोलन तिवसा : अमरावती ते नागपूर दरम्यान डझनावरी विनाथांबा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. या बसेस येथे थांबत नाही. परिणामी शिक्षणासाठी अमरावतीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार निवेदन देऊनही महामंडळाचे धोरण बदलले नाही. त्यामुळे जनतेची डोकेदुखी वाढविणाऱ्या मंडळाच्या बेपर्वा कारभाराचा निषेध म्हणून ‘झेंडू बाम’ आंदोलन करण्यात आले. येथील बसस्थानक प्रमुख प्रतिक मोहोड यांच्यासह प्रवाशांना ‘झेंडूबाम’ वाटप करण्यात आले. यावेळी नरेंद्र विघ्ने, मधुकर भगत, सागर राऊत, प्रथिक शापामोहन, अंकुश देशमुख, गौरव उके, प्रसाद राजुरकर, शिवा शापामोहन, अतुल देशमुख आदी उपस्थित होते.