अमरावती: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या घरासमोर युवासेनेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 00:17 IST2022-04-16T00:14:12+5:302022-04-16T00:17:43+5:30
“मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका, हिंदुत्व आमच्या रक्तात”; घरासमोर हनुमान चालिसा वाजवत राणा दाम्पत्याविरोधात युवासेनेची जोरदार घोषणाबाजी.

अमरावती: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या घरासमोर युवासेनेचे आंदोलन
अमरावती:अमरावतीत हनुमान चालिसा वरून जोरदार राजकीय वातावरण तापलं आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू, असा इशारा दिला होता.
अमरावतीच्या युवासेनेने राणा दाम्पत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रात्री१०.४५ दरम्यान राणा दाम्पत्याच्या घरासमोर युवासेनेने आक्रमक आंदोलन करत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या तसेच लाऊड स्पीकर हनुमान चालिसा वाजवत आंदोलन केले. ३० मिनिटे युवासेनेने राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी राजा पेठ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केले, तर मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली.