खदानात ६० फुटांवरून पडल्याने युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 21:04 IST2018-04-03T21:04:07+5:302018-04-03T21:04:07+5:30
गिट्टी खदानमध्ये ६० फूट उंचीवर पडल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. सतीश भीमराव वंजारी (२९,रा. मासोद, ह.मु. यशोदानगर) असे मृताचे नाव आहे

खदानात ६० फुटांवरून पडल्याने युवकाचा मृत्यू
अमरावती : गिट्टी खदानमध्ये ६० फूट उंचीवर पडल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. सतीश भीमराव वंजारी (२९,रा. मासोद, ह.मु. यशोदानगर) असे मृताचे नाव आहे.
मासोद परिसरात अशोक बसेरीया यांची गिट्टी खदान आहे. तेथे सतीश वंजारी हा काम करत होता. तो सोमवारी सायंकाळी ६ वाजता घराबाहेर पडल्यानंतर मंगळवारी सकाळीच त्याचा मृतदेह आढळून आला. गिट्टी खदानीत मृतदेह असल्याची माहिती राहुल काळबांडे यांनी फे्रजरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, घटनास्थळावरील मृतदेहाजवळ डिझेलच्या दोन कॅन आढळल्या. त्यापैकी एका कॅनमध्ये डिझेल भरलेले होते. गिट्टी खदानाच्या वरच्या भागात एक दुचाकी पोलिसांना दिसली. सतीश हा डिझेल घेऊन जात असताना तो ६० फूट खोल भागात पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून पुढील चौकशी सुरु केली आहे.