डिव्हायडर ब्लॉकला धडक लागल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:53 IST2019-02-10T21:53:21+5:302019-02-10T21:53:44+5:30
शहरातील रस्त्याच्या दुभाजकासाठी आवश्यक ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. रविवारी सकाळी एक दुचाकीस्वार त्या ब्लॉकवर धडकल्याने हा अपघात झाला. प्रकाश बाबुलाल कासदेकर (वय १९ वर्षे) असे मृताचे नाव आहे.

डिव्हायडर ब्लॉकला धडक लागल्याने युवकाचा मृत्यू
धारणी : शहरातील रस्त्याच्या दुभाजकासाठी आवश्यक ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. रविवारी सकाळी एक दुचाकीस्वार त्या ब्लॉकवर धडकल्याने हा अपघात झाला. प्रकाश बाबुलाल कासदेकर (वय १९ वर्षे) असे मृताचे नाव आहे.
शहरात तुर्तास कंत्राटदारामार्फत रस्ता दुभाजक बनविण्याचे काम सुरु आहे. दृष्टी जाईल तेथे अस्तव्यस्त स्थितीत बांधकाम साहित्य व ब्लॉक पडलेले आहेत. दरम्यान रविवारी सकाळी ७ वाजता दुनी येथील प्रकाश बाबुलाल कासदेकर हा वडीलांना पैसे द्यायला एका हॉटेलमधून घरी जात होता. जिल्हा परिषद हायस्कूलजवळ रस्त्यावरील डिव्हायडरच्या ब्लॉकला त्याची दुचाकी धडकली. त्यात प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. यापुर्वी १९ जानेवारी रोजी अश्विन बोदळे (३४, रा.रोहिणी, जि.वर्धा) यांचा डिव्हायडरला धडकून जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय लायदे यांनी साबांवि धारणी व संजय कन्स्ट्रक्शन परतवाडा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी तक्रार धारणी पोलिसात २५ जानेवारीला दिली होती. परंतु पोलिसांनी त्या तक्रारीवर कुठलिही कारवाई केली नाही.
संजय लायदे यांची तक्रार प्राप्त झाल्यावर कंत्राटदाराला नोटिस बजावली आहे. त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे व काम तातडीने पूर्ण करण्याची सुचना देण्यात आल्या आहेत.
- विलास कुलकर्णी,
पोलिस निरीक्षक धारणी .