अमरावतीत टोळक्याकडून युवकाचा खून

By प्रदीप भाकरे | Updated: February 20, 2024 23:17 IST2024-02-20T23:16:33+5:302024-02-20T23:17:05+5:30

यामुळे परिसर हादरला आहे.

youth was killed by a gang in amravati | अमरावतीत टोळक्याकडून युवकाचा खून

अमरावतीत टोळक्याकडून युवकाचा खून

अमरावती : शहरातील सरोज कॉलनी येथे पाच जणांच्या टोळक्याकडून युवकाचा चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसर हादरला आहे.

गणेश कोहळे (२९, रा. जयनगर नं. १) असे मृताचे नाव आहे. घराबाहेर असलेल्या गणेशला त्याच्या पाठीमागे युवकांचे टोळके लागल्याची कुणकुण लागताच त्यांच्यापासून वाचण्यासाठी तो दुसरीकडे पळत गेला. तथापि, युवकांनी त्याला गाठले आणि चाकूने सपासप वार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर त्या युवकांनी पलायन केले. त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर राजापेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आटोपल्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, गणेश कोहळे याचीदेखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवारी त्याने परिसरातील एकावर चाकू उगारला होता. त्याचा वचपा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: youth was killed by a gang in amravati