शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

युवा स्वाभिमानने ठोकले विद्यापीठाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:38 IST

बडनेरा विधानसभा मतदारसंघाने आ. रवि राणाद्वारे स्थापित युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आणि प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून कुलगुरूंच्या कार्यशैलीचा बुधवारी निषेध नोंदविला. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन प्रवेशद्वारावर चिकटविण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.

ठळक मुद्देकुलगुरूंच्या कार्यशैलीचा निषेध : विद्यार्थी प्रश्नांवर आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघाने आ. रवि राणाद्वारे स्थापित युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आणि प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून कुलगुरूंच्या कार्यशैलीचा बुधवारी निषेध नोंदविला. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन प्रवेशद्वारावर चिकटविण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे अनूप अग्रवाल, नीलेश भारती, धीरज केणे, नीलेश भेंडे आदींच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी परीक्षा विभाग, युवा महोत्सव परीक्षणात घोळ, अभियांत्रिकी महाविद्यालयांना कॅरीआॅन, विद्यार्थी विकास मंडळ बरखास्त करण्यासह विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने विद्यापीठात धडक दिली. मात्र, आंदोलक तीव्र भूमिका घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने अगोदरच अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्याअनुषंगाने विद्यापीठ परिसराला छावणीचे रूप आले होते.प्रारंभी युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच रोखून फ्रेजरपुरा ठाण्याचे निरीक्षक आसाराम चोरमले यांनी आत प्रवेश घेण्यास मनाई केली. त्यामुळे विद्यार्थी व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला.अनूप अग्रवाल, नीलेश भेंडे यांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला कुलगुरूंसोबत चर्चा करून मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे, असे बोलून प्रवेश मिळविला. मात्र, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांचे दालन असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांनी पुन्हा आंदोलकांना रोखले. कुलगुरूंची परवानगी असल्याशिवाय आत जाता येणार नाही, अशी भूमिका सुरक्षा रक्षकांनी घेतली. काही वेळाने प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आलेत; मात्र प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप असल्याने चॅनेल गेटच्या एका बाजूला विद्यार्थी आणि दुसºया बाजूला जयपूरकर असा संवाद चालला. आम्हाला आत येऊ द्या, आम्ही चोर, गुंड किंवा दरोडेखोर नाही, असा मुद्दा युवा स्वाभिमानने यावेळी उपस्थित केला. यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर लावलेले कुलूप काढण्याबाबत सुरक्षा रक्षकांसोबत शाब्दिक वादही झाला. यानंतर कुलगुरू मुरलीधर चांदेकर आंदोलक आले; मात्र प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप कायम होते. माइंड लॉजिक कंपनीचा करार तात्काळ रद्द करण्यासह कॅरीआॅन, युवा महोत्सव परीक्षणातील घोळ अशा प्रश्नांवर तोडगा काढा, अशी मागणी त्यांनी ठेवली. यावेळी परीक्षा व मूल्यांकन संचालक हेमंत देशमुख उपस्थित होते. कुलगुरू चांदेकरांच्या उत्तराने विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. यादरम्यान प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यावरून पोलिसांसोबत शाब्दिक वादही झाला.अखेर युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने इमारतीचे प्रवेशद्वार आणि विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप ठोकून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अभिजित देशमुख, अनूप अग्रवाल, महेश भारती, नीलेश भेंडे, धीरज केणे, मयूर कैथवास, अंकुश ठाकरे, रौनक किटुकले, अमर काळमेघ, अभिजित काळमेघ, राहुल काळे, आकाश राजगुरे, नीलेश गहलोत, कौस्तुक मिरजारपुरे, निरंजन अग्रवाल, प्रफुल्ल फुरगुंडे, कुलदीप निर्मळ, प्रफुल्ल इंगोले, निखील सातनूरकर आदींनी आंदोलनाची धुरा सांभाळली.