शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा प्रयत्न धादांत खोटा अन् चुकीचा; आनंदराज आंबेडकरांचे वंचितवर गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 21:22 IST

Prakash Ambedkar VBA: वंचितच्या पाठिंब्याच्या पत्रावर आगपाखड करत आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Anandraj Ambedkar ( Marathi News ) : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला तीन दिवसांपूर्वी पत्र लिहूनही त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा न दिल्याने आणि संविधानप्रेमी जनतेच्या मतांमध्ये होणारी विभागणी टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी काल जाहीर केलं होतं. त्यानंतर आज वंचित आघाडीने पत्र लिहीत आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र वंचितच्या या पत्रावर आगपाखड करत आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

वंचितवर हल्लाबोल करताना आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, "वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आपले दि. ०४/०४/२०२४ रोजीचे माझ्या अमरावती मतदारसंघातील उमेदवारीला पाठिंबा असल्याचे पत्र मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. परंतु आपल्या सदर पत्रात आपण माझ्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी समर्थन करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार नामांकन दाखल करणार नाही असे आपल्या पक्षाने व अधिकृत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे. हा तुमचा प्रयत्न अतिशय धादांत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारा आहे," असा आरोप त्यांनी केला आहे.

वंचितच्या कार्यकर्त्यांना 'ती' ताकीद देण्यात आली होती; आनंदराज आंबेडकरांचा दावा

आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, "मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की माझ्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या नामांकन रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नका अशा फोनद्वारे सूचना वजा ताकीद देण्यात आली होती अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. सदरहू मी तीन दिवस अगोदर पासून वंचित बहुजन आघाडीला पाठिंब्यासाठी पाठवलेल्या पत्रानुसार पाठिंब्याच्या प्रतिक्षेत होतो आणि अखेरीस नाईलाजास्तव संविधान प्रेमी जनतेची पुन्हा एकदा मतविभागणी होऊन भाजपा सरकार येऊ नये म्हणून माझ्या पक्ष संघटनेने निर्णय घेऊन माझी अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मागे घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि संबंधित पत्र मी दिनांक ०३/०४/२०२४ ला माझ्या आधिकृत फेसबुक पेज वरून प्रसारित केले. आता त्यामध्ये किंचितही बदल होणे शक्य नाही. तेव्हा आपण उशीरा दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुनःच्छ आपले आभार आणि माझ्याकडून शुभेच्छा," अशा शब्दांत आनंदराज आंबेडकर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

वंचितने आनंदराज आंबेडकरांना आज पाठिंबा देताना काय म्हटलं होतं?

आनंदराज आंबेडकर यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज वंचित आघाडीने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारं पत्र जारी केलं होतं. "अमरावती लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार अर्ज भरणार नाही, असे आपल्याला पक्षाकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या उमेदवाराला अर्ज दाखल करू नये, अशी स्पष्ट सूचना आम्ही दिली व त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यात आलेला नाही. आपण अमरावती लोकसभा मतदारसंघात लढणार असाल, तर आधी ठरल्याप्रमाणे आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा राहील. त्यामुळे आपण अर्ज मागे घेऊ नये व उमेदवारी कायम ठेवावी अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही करत आहोत," असं या पत्रात म्हटलं होतं.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीamravati-pcअमरावतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४