शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे जिन सवार...त्याला झोपू द्या, ‘विज्ञान’ पदवीधर रितिक ठरला अघोरी विद्येचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 13:51 IST

त्याच्यावर जिन सवार आहे. त्यामुळे तो सध्या झोपी गेला, त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल, असे सांगत आर्वी येथील एका तथाकथित मांत्रिकाने अमरावती येथील एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला.

ठळक मुद्देमांत्रिक बाप-लेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा : अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचाही बडगा

अमरावती : स्थानिक बेलपुरा येथील विज्ञान पदवीधारक विद्यार्थी बळी ठरल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून, याप्रकरणी आर्वी पोलिसांनी एका मांत्रिकासह त्याच्या दोन मुलांविरुद्ध भादंविचे कलम ३०२, २०१ (पुरावा नष्ट करणे) व महाराष्ट्र बळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू नियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल केला.

रितिक गणेश सोनकुसरे (२२, रा. बेलपुरा), असे मृताचे नाव आहे. १८ मे रोजी सकाळी आर्वी येथे आपल्या घरी रितिकचा मृत्यू झाल्याची माहिती मांत्रिक अब्दुल रहीम अ. मजीद याने मृताच्या पित्याला दिली होती. अब्दुल रहीम अ. मजीद व त्याची दोन मुले अ. जुनेद व अ. जमीर (तिघेही रा. विठ्ठल वार्ड, आर्वी, जि. वर्धा) यांनी रितिकवर उपचार करण्याचा बहाणा करून त्याला आर्वी येथे नेले. तेथे त्याचा तांत्रिक विद्येने इलाज करून त्याला जिवानिशी ठार मारले, अशी तक्रार रितिकच्या पित्याने नोंदविली.

१९ मे रोजी रात्री ८.५५ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापूर्वी १८ मे रोजी रितिकचे पार्थिव अमरावतीत आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विज्ञान पदवीधर असलेल्या व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या आपल्या मुलाचा आर्वीच्या त्या बाबाने अघोरी विद्येचा प्रयोग करून बळी घेतल्याचा आरोप रितिकच्या पित्याने ‘लोकमत’कडे केला. ‘टीम लोकमत’ने शुक्रवारी बेलपुरा येथील सोनकुसरे यांचे घर गाठून संपूर्ण वास्तव जाणून घेतले.

म्हणे, तुमच्या घरी दोन जीन!

१७ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास मांत्रिक अ. रहीम हा त्याच्या दोन मुलांसह बेलपुरा येथे आला. घराची तपासणी करून तुमच्या घरी दोन जीन आहेत, घरी सहा खड्डे करून पूजा करून बंदोबस्त करतो, अशी बतावणी करून त्याने दोन हजार रुपये घेतले. काही साहित्यदेखील आणले. मात्र, एक साहित्य नागपूरला मिळते. त्यामुळे आपण ही पूजा शनिवारी करू, असे म्हणत मांत्रिक त्याच्या दोन मुलांसह रितिकलादेखील आर्वीला त्याच्या घरी घेऊन गेला.

माझ्यासोबत काही तरी दुर्घटना होणार

रितिकने१७ मे रोजी रात्री १०.४५ वाजता पित्याला फोन केला. आपल्याला कसेसे वाटत आहे, माझ्यासोबत काही तरी दुर्घटना होणार आहे, असे वाटत असल्याचे तो म्हणाला. १८ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास मांत्रिक अ. रहीमने रितिकचा मृत्यू झाला असून, त्याचे शव येथून घेऊन जा, असे फोन काॅलवर सांगितले. त्यावर सोनकुसरे हे पुतण्या व मित्रासमवेत आर्वीला पोहोचले. तेथे रितिक मृतावस्थेत पडला होता, तर त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणा दिसून आल्या.

अंगात मुंग्या येते अन् पोटात अग्निदाह

अंगात मुंग्या येते, पोटात जळल्यासारखे वाटते, तसेच अंगात सुया टोचल्यासारखे वाटते, अशी तक्रार रितिकने पित्याकडे चार महिन्यांपूर्वी केली होती. त्याच्यावर पीडीएमसीमध्ये उपचारदेखील करण्यात आला. ती बाब रितिकच्या पित्याने त्यांच्या मानस बहिणीकडे कथन केली. तिने आर्वी येथील अ. रहीम नामक मांत्रिकाचे नाव सांगून फोन नंबरदेखील दिला. तीन महिन्यांपूर्वी रितिकला घेऊन त्याचे वडील अ. रहीमकडे पोहोचले. तेथे त्याने ताबीज, लिंबू व बिबे दिले. उतारादेखील काढला. दिलेले अंडे शहराच्या चौरस्त्यावर फेकण्यास सांगितले.

असे पडले पितळ उघडे

आरोपींनी रितिक याची गळा आवळून हत्या केल्यावर रितिकला त्याच्या वडिलांच्या हवाली करण्यात आले. पण आपले पितळ उघडे पडू नये तसेच रितिक गतप्राण झाला याची कुठलीही शंका मृताच्या वडिलांना येऊ नये म्हणून आरोपींनी रितिकवर जीन सवार आहे. तो सध्या झोपून असून त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल असे सांगितले. मात्र, अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या रितिकच्या वडिलांना त्याच्या गळ्यावर ओरबडल्याचे दिसल्याने त्यांनी अमरावतीतील इर्विन रुग्णालय गाठले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याने गणेश सोनकुसरे यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAmravatiअमरावतीwardha-acवर्धा