शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 22:10 IST2020-09-25T22:10:18+5:302020-09-25T22:10:27+5:30

शेतात गेलेला अनिकेत घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यात आला.

Young man drowns in farm | शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

तळेगाव दशासर (अमरावती) : चांदूररेल्वे तालुक्यातील बग्गी जावरा येथील एका तरुणाचा गावशिवारालगतच्या शेततळ्यात मृतदेह आढळून आला. २४ सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना उघड झाली. अनिकेत संजय चौकडे (२२, रा. बग्गी जावरा), असे मृताचे नाव आहे. अनिकेत चौकडे हा २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेतातून बेपत्ता  झाला होता. शेतात गेलेला अनिकेत घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यात आला.

गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता त्याच्याच शेताजवळील  शेततळ्यात त्याचा मृतदेह तरंगताना दिसून आला.  तळेगाव दशासर पोलिसांना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदुर रेल्वे येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला. 

तळेगाव दशासर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला. अधिक तपास येथील ठाणेदार अशोक कांबळे व संतोष सांगडे हे करीत आहेत. अनिकेतचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला असला, तरी तो पोहायला गेला की त्याने आत्महत्या केली, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.

Web Title: Young man drowns in farm