शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

यशोदानगर परिसरात पुन्हा बंदचा प्रयत्न

By admin | Updated: November 6, 2014 22:47 IST

सोशल मीडियावर महामानवांचे आक्षपार्ह छायाचित्रे आणि मजकूर अपलोड प्रकरणी यशोदानगर ते दस्तूरनगर भागात बुधवारी बाजारपेठ बंद करुन प्रचंड तोडफोड, दगडफेक, नासधुस व मारहाणीची घटना घडली.

पोलीस बंदोबस्तात बाजारपेठ सुरु अमरावती : सोशल मीडियावर महामानवांचे आक्षपार्ह छायाचित्रे आणि मजकूर अपलोड प्रकरणी यशोदानगर ते दस्तूरनगर भागात बुधवारी बाजारपेठ बंद करुन प्रचंड तोडफोड, दगडफेक, नासधुस व मारहाणीची घटना घडली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा याच परिसरात व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी नगरसेवकासह दहा जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारच्या घटनेत तिघांना अटक करण्यात आली असून ३० ते ४० जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दस्तुरनगर ते यशोदानगर मार्गावर बुधवारी सायंकाळी अचानक दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. तोडफोड प्रकरणी तिघांना अटकदुचाकीवर आलेल्या एका टोळक्याने या मार्गावरील बाजारपेठ जबरीने बंद करताना दुकानांची प्रचंड नासधूस केली होती. दस्तुरनगर चौकात मारहाणीचीही घटना घडली. परंतु पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आला.दरम्यान गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नगरसेवक अजय गोंडाणे यांच्या नेतृत्वात यशोदानगर, दस्तुरनगर, मोतीनगर भागात बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आली. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन नगरसेवक अजय गोंडाणेसह राजेश बागडे, अमोल चिंचखेडे, उत्तमराव धंदर, जितू कंठाळे, विष्णू मेश्राम, सुबोध मेश्राम, रमेश मेश्राम, नरेंद्र बोरकर, वीरेंद्र गजभिये व मनोज भाले या दहा जणांना ताब्यात घेतले.दुसरीकडे बुधवारी यशोदानगर परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या या टोळक्यांचा शोध सुरु करुन संजय गांधीनगर नं. २ येथील रहिवासी सुरेश तायडे याला अटक केली.तसेच अटकेत अन्य दोघांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी येथील कंवरनगर परिसरातील एसएसडी विहार येथील रहिवासी सुनीलकुमार ताराचंद दारा यांच्या तक्रारीनुसार वाहन क्रमांक एमएच २७ बीडी ३२०७ चा चालक व अज्ञात ३० ते ४० जणांविरूद्ध भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ४२७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतीश इंगळे करीत आहे. बुधवारी झालेल्या घटनेनंतर पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी शांतता समितीची बैठक बोलाविली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.