तिसरीच्या विद्यार्थिनीला येईना नऊचा पाढा!

By Admin | Updated: November 19, 2016 00:11 IST2016-11-19T00:11:23+5:302016-11-19T00:11:23+5:30

प्राथमिक शिक्षणावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. शिक्षकांच्या वेतनावर दरमहा महापालिकेची तिजोरी रिती होती.

Yehina Nau to third grade student! | तिसरीच्या विद्यार्थिनीला येईना नऊचा पाढा!

तिसरीच्या विद्यार्थिनीला येईना नऊचा पाढा!

गुणवत्तेचा बट्ट्याबोळ : रुख्मिणीनगर शाळेचे वास्तव, दर्जा सुधारणार कसा?
प्रदीप भाकरे अमरावती
प्राथमिक शिक्षणावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. शिक्षकांच्या वेतनावर दरमहा महापालिकेची तिजोरी रिती होती. मात्र, शिक्षणासाठी खर्चाची साध्यता होत नसल्याचे भीषण वास्तव आहे. गुरूवारी रूख्मिणीनगर शाळा क्र.१९ मध्ये उपस्थित चारपैकी तिसरीतील विद्यार्थीनीने चक्क ‘नऊ सकं पंचेचाळीस’ असे सांगितले. हे उत्तर महापालिका शाळांचा दर्जा किती सुमार झालाय, याचे प्रतिनिधिक उत्तर ठरले आहे.
आ. सुनील देशमुख यांनी रूख्मिणीनगर क्र. १९ ही महापालिकेची शाळा दत्तक घेतली आहे. याशाळेचा खालावलेला दर्जा सुधारावा, शाळेला उर्जितावस्था यावी, यासाठी याशाळेचे आमदार निधीतून १५ ते २० लाख रूपयांची आर्थिक मदत केली. मात्र, शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या बाह्यदर्शनी भागाची रंगरंगोटी आणि अग्रभागावर टाईल्स लाऊन भौतिक सुविधेला अग्रक्रम दिला गेला आहे. प्रत्यक्षात विद्यार्थीसंख्या आणि दर्जाबाबत कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. महापालिकेची कोट्यवधी रूपयांची ही मालमत्ता विद्यार्थ्यांविना ओस पडून आहे.
आ. सुनील देशमुख यांनी ही शाळा दत्तक घेतली असली तरी या स्तुत्य उपक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेच्या शिक्षण विभागाची आहे. तथापि त्यांनी दुर्लक्ष चालवले आहे.

महापालिकांच्या शाळा वाऱ्यावर
अमरावती : कायदेशिर अधिकार नसल्याने आणि नवे काही करण्याची उमेद नसल्याने शिक्षण विभाग आणि पर्यायाने महापालिकांच्या शाळा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
शिक्षकांच्या नोकरीसाठी खटाटोप : रूख्मिणीनगर, अंबिकानगर, रामनगर या व अशा २१ ते २५ द्विशिक्षकीय शाळांची अवस्था फारच बिकट आहे. १ ते ५ वर्ग मिळून १५ ते ३० अशी पटावर संख्या आहे. प्रत्यक्षात ती बनावटच आहे. मात्र, शिक्षकांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी आणि अनुदान मिळविण्यासाठी पटावरचा खेळ सुरू आहे. त्याला प्रशासनाचे दुर्लक्षही कारणीभूत आहे.

नर्सरी कुलूपबंद
देशमुखांच्या या दत्तकशाळेत यंदा प्रथमच इंग्रजी माध्यमातील नर्सरी सुरू करण्यात आली. १३ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला. मात्र, खेळण्या-बागडण्याच्या वयात कुठलीही सुविधा, खेळणी उपलब्ध नसल्याने ही इंग्रजी नर्सरी पाच महिन्यांपासून कुलूपबंद आहे. अगदी सुरूवातीला येथे विद्यार्थी येत होते. मात्र, विद्यार्थ्यांना नर्सरीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने पालकांनीच आपल्या पाल्याला पाठविणे बंद केल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे सुरूवात होताच अपशकून अशी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेची अवस्था झाली आहे.

वराहांचा मुक्तसंचार
रुख्मिणीनगर या प्रतिष्ठित वस्तीत आलेल्या या महापालिकेच्या शाळा परिसरामध्ये वराहांचा मुक्तसंचार आहे. मुलांची अत्यल्प पटसंख्या, ३ शिक्षक आणि भलीमोठी इमारत पांढरा हत्ती ठरली आहे. त्यातच वराहांच्या मुक्त संचाराने लहानग्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एखाद्या शाळेमध्ये वराह कसे असू शकतात, याचे उत्तर रुख्मिणीनगर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे नाही.

Web Title: Yehina Nau to third grade student!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.