यंदा १६०० मंडळांत होणार नवरात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 05:00 AM2020-10-14T05:00:00+5:302020-10-14T05:00:15+5:30

शक्तिपीठ असलेल्या अंबादेवी, एकवीरादेवी मंदिरात यंदा पूजाअर्चा नियमित होईल. मात्र, भाविकांना थेट दर्शनाकरिता प्रवेश राहणार नाही. कुठेही स्टॉल लागणार नाही, यात्रा भरणार नाही. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिषासूरमर्दिनीला आपापल्या घरातूनच साकडे घालावे लागणार आहे. याबाबत शहरातील विविध नामांकित दुर्गा उत्सव मंडाळांमार्फत सामाजिक उपक्रम राबवून कोरोनासंबंधी नियमांची लोकल चित्रवाहिनींवर, फेसबुकद्वारे जनजागृती करण्याचे जिल्हा प्रशासनाने सूचित केले आहे.

This year Navratri festival will be held in 1600 circles | यंदा १६०० मंडळांत होणार नवरात्रोत्सव

यंदा १६०० मंडळांत होणार नवरात्रोत्सव

Next
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार उत्सव

 इंदल चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १६०० दुर्गोत्सव मंडळांसह २०० शारदीय मंडळांमार्फत नवरात्रोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच असल्याने जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी-शर्तीच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करावा लागणार आहे.
शक्तिपीठ असलेल्या अंबादेवी, एकवीरादेवी मंदिरात यंदा पूजाअर्चा नियमित होईल. मात्र, भाविकांना थेट दर्शनाकरिता प्रवेश राहणार नाही. कुठेही स्टॉल लागणार नाही, यात्रा भरणार नाही. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिषासूरमर्दिनीला आपापल्या घरातूनच साकडे घालावे लागणार आहे. याबाबत शहरातील विविध नामांकित दुर्गा उत्सव मंडाळांमार्फत सामाजिक उपक्रम राबवून कोरोनासंबंधी नियमांची लोकल चित्रवाहिनींवर, फेसबुकद्वारे जनजागृती करण्याचे जिल्हा प्रशासनाने सूचित केले आहे. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, नियमित साबनाने हात धुणे, मास्कचा नियमित वापर करण्याबाबतच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अमरावती शहरात दुर्गा देवीची मूर्ती यंदा चार फुट उंचीच्या असाव्यात, असे मूर्तिकारांना सूचविण्यात आले आहे. त्यामुळे मिरवणूकदेखील यंदा निघणार नसल्याचे सांगण्यात आले.

मंडळांचे सामाजिक उपक्रम
यंदा दुर्गोत्सव मंडळांमार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केलेल्या उपाययोजनांसंदर्भात सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मास्क चेहऱ्यावर बांधणे, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा नियमित वापर, अकारण रस्त्यावर न फिरणे, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र गर्दी करू नये आदी उपक्रम सोशल मीडियाद्वारे राबविले जातील.

पोलीस प्रशासनाचे नियोजन
जिल्ह्यात १७६ पोलीस अधिकारी, २४५९ कर्मचारी तैनात आहेत. त्यापैकी नवरात्रोत्सवात अनुचित प्रकार घडू नये, या अनुषंगाने १७ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ग्रामीण भागात राहणार आहे. दरम्यान राज्य शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले.

अशी आहे नियमावली
कोरोनासंदर्भात सामाजिक संदेश देणारे राबविणे, ते सोशल मीडियावरून प्रसारण करण्यासंदर्भात नियमावली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सवाकरिता वर्गणी गोळा करण्याची परवानगी मिळण्याबाबत ६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १५ मंडळांना परवानगी देण्यात आल्याची माहिती सहायक धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने दिली.

Web Title: This year Navratri festival will be held in 1600 circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.