कार अपघातात दर्यापूरची महिला ठार; पती, मुलगी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 20:01 IST2018-02-24T20:01:58+5:302018-02-24T20:01:58+5:30
कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पत्नी जाग्यावरच ठार झाली, तर त्यांचे पती व लहान मुलगी किरकोळ जखमी झाले.

कार अपघातात दर्यापूरची महिला ठार; पती, मुलगी जखमी
अमरावती : कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पत्नी जाग्यावरच ठार झाली, तर त्यांचे पती व लहान मुलगी किरकोळ जखमी झाले. ही घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वीनजीक सावळापूर फाट्याजवळ शनिवारी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली.
साक्षी पंकज लोंधे (३७, रा. गांधीनगर बनोसा) असे मृताचे नाव असून तिचा पती पंकज रामेश्वर लोंधे (४२) व मुलगी सिया (४) हे थोडक्यात बचावले. जखमींना अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दर्यापूर येथील नामांकित विश्वकर्मा ज्वलर्सचे संचालक पंकज लोंधे हे कुटुंबासह दर्यापूरहून सकाळीच वर्धा येथे नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी कार क्रमांक एमएच २७ बीव्ही ०५९३ ने निघाले. आर्वीपासून ५ किमी अंतरावर वर्धा मार्गावरील सावळापूर फाट्यानजीक वळण रस्त्यावर त्यांचा कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. चालकाच्या डाव्या बाजूला कार रस्त्याच्या कोसळल्याने साक्षी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळावरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढून आर्वी येथील रूग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी साक्षी यांना मृत घोषित केले.
अपघाताची माहिती वाºयासारखी पसरताच जखमींना पाहण्यासाठी सबनीस प्लॉट येथील एका खासगी रूग्णालयात नातेवाईकांनी व आप्तेष्टांनी गर्दी केली होती. मृताचे आर्वी येथेच श्वविच्छेदन करून दर्यापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अवतार मेहरे बाबा प्रेमी असलेल्या लोंधे परिवारावर संकट आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.