शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो, आयोग तुमच्या पाठीशी!

By admin | Updated: July 7, 2014 23:20 IST

महिला आयोगाकडे राज्यभरातून अन्यायग्रस्त महिला आपल्या तक्रारी घेऊन येतात. मात्र, राज्याच्या कानाकोपाऱ्यातून महिलांना मुंबईला ये-जा करणे परवडत नाही.

सुनावणी कार्यक्रम : महिला आयोगाच्या अध्यक्षांचे प्रतिपादनअमरावती : महिला आयोगाकडे राज्यभरातून अन्यायग्रस्त महिला आपल्या तक्रारी घेऊन येतात. मात्र, राज्याच्या कानाकोपाऱ्यातून महिलांना मुंबईला ये-जा करणे परवडत नाही. महिलांनी आयोगाकडे येण्यापेक्षा आयोगानेच महिलांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विभागीय पातळीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता अमरावती विभागातील पीडित, अन्यायग्रस्त महिलांनी कुणालाही घाबरायचे नाही. हा आयोग त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुसीबेन शहा यांनी आज सोमवारी येथे दिली. राज्य महिला आयोगाच्या विभागीय खंडपीठ व विभागीय सुनावणी कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या आर्शा मिरगे, विजया बांगळे, चित्रा वाघ, विभागीय उपायुक्त माधव चिमजी, उपायुक्त माधव बोरखडे यांची उपस्थिती होती. महिलांना त्यांच्या अधिकारांची माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगत शहा म्हणाल्या, महिलांनी अत्याचार सहन करु नये, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला जरूर वाचा फोडावी, महिला घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लैंगिक हिंसाचारालाही बळी पडतात. अनेक महिला आपले नाव कलंकित होईल, या भीतीने आपल्यावरील लैंगिक अत्याचार सहनच करीत जातात. अशा महिलांनी अजिबात न घाबरता धाडसाने समोर येऊन महिला व बालकल्याण विभागाच्या महिला समुपदेशन केंद्राची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. आयोगाच्या सदस्या तथा अमरावती विभागाच्या प्रमुख आशा मिरगे यांनी २ आॅगस्टपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी अमरावती विभागातील अन्यायग्रस्त महिलांची सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेणार असल्याचे प्रास्ताविकातून सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत स्थापन केलेल्या महिला मदत केंद्राची माहिती दिली. सर्वप्रथम दीप प्रज्ज्वलन करून राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच आयोगाच्या अमरावती विभागीय खंडपीठाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर तीन बेंच तयार करण्यात येऊन विभागातून आलेल्या पीडित महिलांच्या तक्रार अर्जांवर सुनावणी करण्यास सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन क्षीप्रा मानकर तर आभार प्रदर्शन जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कैलास घोडके यांनी केले. याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अर्जदार महिला, गैरअर्जदार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)