शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

-तर ट्रकखाली चिरडली असती विद्यार्थिनी

By admin | Updated: September 3, 2016 00:10 IST

गुरूवारी सकाळी ७ वाजताची वेळ. पोळा असल्याने तिवसा तालुक्यातील संपूर्ण शाळा सकाळच्या सत्रात होत्या.

अपघात टळला : स्थानकाबाहेरच थांबतात बसेस गुरुकुंज (मोझरी) : गुरूवारी सकाळी ७ वाजताची वेळ. पोळा असल्याने तिवसा तालुक्यातील संपूर्ण शाळा सकाळच्या सत्रात होत्या. शाळेत जाण्याकरिता तिवसा येथील दंडाळे महाविद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी बसस्थानकावर उभी होती. मात्र, बसचालकाने स्थानकाबाहेर बस थांबविल्याने रस्ता ओलांडून बसकडे जाताना भरधाव ट्रकखाली विद्यार्थिनी चिरडली जाणार, तोच शिक्षकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. गुरुकुंजातील रहिवासी मुलगी सकाळी ६.५५ वाजता तिवसा येथे शाळेला जाण्याकरिता बसच्या प्रतीक्षेत उभी होती. अमरावती- नागपूर बस गुरूकुंज मोझरी येथे पोहोचली. पण चालकाने बस स्थानकाबाहेर महामार्गालगतच उभी केली. बस पकडण्यासाठी रस्ता ओलांडून जात असताना भरधाव ट्रक विद्यार्थिनीला धडक देणारच होता. तेवढ्यात तेथे उपस्थित एका शिक्षकाने ओरडून विद्यार्थिनीला रोखले आणि भयंकर घटना टळली. या स्थानकावर हा प्रकार नित्याचा झाला आहे. बस स्थानकात न येता महामार्गालगतच थांबतात. त्यामुळे विद्यार्थी धावपळ करीत रस्ता ओलांडून बस पकडण्याचा प्रयत्न करतात.अशा वेळी भयंकर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी तिवसा पोलिसांनी वाहतूक शिपायाची नियमित नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. गुरुकुंज मोझरी परिसरातील वाहतूक प्रचंड अनियंत्रित झाली असून अरुंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. परिसरातील आठ गावांची सुरक्षा आज तिवसा पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)बस स्थानकाजवळ वाहतूक शिपाई हवाराष्ट्रीय महामार्गावर गुरुकुंज हे गाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम, शाळा-महाविद्यालय आहे. याठिकाणी वाहनांची नेहमी वर्दळ असते तसेच भाविक व विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी येथे वाहतूक शिपायाची नियुक्ती व्हावी.