ट्रकवर धावती कार आदळून महिला ठार; जखमींना रुग्णालयात केले दाखल, अमरावतीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:42 IST2021-09-08T14:41:00+5:302021-09-08T14:42:22+5:30
जखमींवर रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.

ट्रकवर धावती कार आदळून महिला ठार; जखमींना रुग्णालयात केले दाखल, अमरावतीमधील घटना
अमरावती : ट्रकवर धावती कार आदळल्याने एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना पथ्रोटनजीकच्या पांढरी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ बुधवारी दुपारी दीड वाजतादरम्यान घडली. जखमींवर रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी येथील एम.एच.२७ बीव्ही २०१२ क्रमांकाच्या कारने समाजसेवक प्रमोद निपाने आणि अंगणवाडी सेविका ललिता चव्हाण हे जात होते. पांढरी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ वळण रस्त्यावर अचानक ट्रकमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. यात ललिता चव्हाण या जागीच ठार झाल्या, तर प्रमोद निपाणे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. याच ठिकाणी दहा दिवसांपूर्वी अपघात झाला होता.