शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक हलविल्यानंतर काही तासांतच परिस्थिती जैसे-थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गावर अवैधरीत्या शेकडो ट्रकची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलिसांनी या परिसरातील ट्रक हटविण्यात आले होते. सदर कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली होती. परंतु काही तासांतच जैसे ...

ठळक मुद्देट्रान्सपोर्टनगरात अवैध पार्किंग : आदेशाची पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गावर अवैधरीत्या शेकडो ट्रकची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलिसांनी या परिसरातील ट्रक हटविण्यात आले होते. सदर कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली होती. परंतु काही तासांतच जैसे थे परिस्थिती झाल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता राजरोसपणे ट्रकची पार्किंग केली जात आहे.'लोकमत'ने काही दिवसांपूर्वीच हा प्रश्न लोकदरबारात मांडला होता. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी या मुद्यावर चर्चा करून रस्त्यावरील उभे राहणारे ट्रक या ठिकाणीवरून काढण्याचे आदेश पोलिसांना व संबंधित यंत्रणेला दिले होते.त्याअनुषंगाने शुक्रवारी पोलिसांच्या ताफ्यासह या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पण शनिवारी सकाळी सदर ट्रक पुन्हा रस्त्यावर उभे करण्यात आले होते. त्यामुळे ट्रान्सपोर्टनगरातील विविध ट्रान्सपोर्ट संचालकांवर कारवाईचा बडगा का उगारू नये, असा प्रश्न विचारला जात आहे. ट्रान्सपोर्टनगर पासून वलगावला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर हजारो वाहनांची रोज ये-जा सुरू असते. परंतु अनेक प्रभागांतून दुचाकीस्वार मुख्य रस्त्यावर येतात. तेव्हा ट्रक या ठिकाणी उभे करून अतिक्रमण केले जात असल्याने वाहनचालकांना समोेरच्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रोजच किरकोळ अपघात होत आहेत. मोठा अपघात होण्याची शक्यता असून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, हा प्रश्नही पुढे येत आहे.