Wife killed husband in Amravati: घराच्या दुरुस्तीसाठी घरी येत असलेल्या मिस्त्री विश्वंभर मांजरेवर विवाहित छायाचा जीव जडला. वर्षभरापासून दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले. दुसऱ्या जिल्ह्यात नोकरीला असलेल्या पती प्रमोदला छायाच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल शंका येऊ लागली. यांचा अंदाज छायाला आला. तिने आणि विश्वंभरने थंड डोक्याने कट रचून पती प्रमोदची हत्या केली.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथे घडली. मयत प्रमोद भलावी (वय ४२) हा चंद्रपूरमध्ये नोकरी करत होता. तर छाया सात वर्षांपासून अंजनगाव बारी येते मुलांसह राहत होती. दरम्यान, वर्षभरापूर्वी त्यांनी घराच्या दुरुस्तीचे काम काढले.
विश्वंभरसोबत विवाहबाह्य संबंध
मिस्त्री विश्वंभर मांजरे (वय ३९) हा त्यांच्या घराच्या कामासाठी येत होता. याच काळात छाया आणि विश्वंभर यांच्यात जवळीक वाढत गेली आणि दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. छायाचे विवाहबाह्य संबंध असल्याचे प्रमोदला शंका येऊ लागली. त्याबद्दल अंदाज येताच छायाने विश्वंभरला सांगितले की, आपल्या संबंधाबद्दल प्रमोदला शंका आहे. तो मला त्रास देत आहे. त्याला संपवले पाहिजे.
देवी दर्शन, जंगलात थांबले आणि...
विश्वंभर आणि छायाने प्रमोदच्या हत्येचा थंड डोक्याने कट रचला.ती आणि विश्वंभर १० नोव्हेंबर रोजी नेरपिंगळाई येथे देवीच्या दर्शनाला गेले. परत येत असताना त्यांनी बाजारातून कोयता घेतला. संध्याकाळी छायाने पती प्रमोदला कॉल केला भेटायला बोलावले.
भेटायला आल्यानंतर छायाने झाडी असलेल्या भागात प्रमोदला थांबायला सांगितले आणि लघुशंकेला जात असल्याचे सांगून झाडीत लपून बसली. त्यानंतर विश्वंभर बाहेर आला आणि त्याने कोयत्याने प्रमोदच्या मानेवरच वार केले.
चेहरा दगडाने ठेचला
प्रमोदची हत्या केल्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह नाल्याशेजारी नेला. तिथेच त्याची दुचाकीही ठेवली. ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचला. त्यानंतर दोघे रात्री ११ वाजता अंजनगाव बारीला आले.
छायाने प्रमोदच्या मोबाईलमधील सीम कार्ड फेकून दिले आणि मोबाईल स्वतः जवळच ठेवला होता. त्या दिवशी विश्वंभर छायाच्या घरीच थांबला होता. दुसऱ्या दिवशी तिने प्रमोद बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर तिचे विश्वंभरसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले. दोघांची चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.
Web Summary : In Amravati, a wife and her lover murdered her husband after a temple visit. The wife pretended to pee, while the lover attacked. They disposed of the body and reported him missing, but police uncovered the affair and the murder plot.
Web Summary : अमरावती में, एक पत्नी और उसके प्रेमी ने मंदिर यात्रा के बाद अपने पति की हत्या कर दी। पत्नी ने पेशाब करने का नाटक किया, जबकि प्रेमी ने हमला किया। उन्होंने शव को ठिकाने लगाया और गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज कराई, लेकिन पुलिस ने प्रेम संबंध और हत्या की साजिश का पर्दाफाश किया।