शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याला झळाळी, पहिल्यांदा विक्रमी १२,२०० दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : देशांतर्गत उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याने पांढरे सोने सध्या चांगलेच भाव खात आहे. ...

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशांतर्गत उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटल्याने पांढरे सोने सध्या चांगलेच भाव खात आहे. या शेतमालाला अमरावतीत आतापर्यंतचा विक्रमी १२,२०० रुपये दर मिळाला. यापूर्वी सोयाबीन १० हजारांवर गेले होते. त्यानंतर, आता कापसाला सातत्याने १० हजारांवर भाव मिळत आहे. जानेवारीपासून कापसाच्या दरात सातत्याने तेजी आली आहे. गत आठवड्यात ११,४०० असा उच्चांकी भाव कापसाला मिळाला होता. त्यानंतर, आता १२ हजारांच्या पार पल्ला कापसाने गाठला आहे. 

देशांतर्गत कापसाचे उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत कमी आलेली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने भाववाढ होत आहे, शेतकऱ्यांचा फारसा कापूस आता शिल्लक नाही. त्यामुळे आवक घटली आहे.- नीलेश लोहाणा, कॉटन ब्रोकर

उत्पादनात कमी आल्याने वाढती मागणी, साठवणुकीचा कापूस विक्रीला

आवक घटलीसाठवणुकीतील कापूस कमी असल्याने आवक कमी होत आहे. सोमवारी कापसाला ९,००० ते १२,२०० रुपये क्विंटल भाव मिळाला. मंगळवारीही हा भाव कायम होता. कापसाची मागणी वाढत असल्याने, काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली. 

बोंडसड अन् बोंडगळखरिपात सुरुवातीला पावसात कमी होती. मात्र, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे कपाशीवर बुरशीजन्य रोगाचा अटॅक झाला. त्यामुळे बोंडसड व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला. काही भागांत तर दोन ते तीन वेच्यांत उलंगवाडी झाली.

 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड