'आयएफएस' बदल्यांची फाइल अडली कुठे ? वनअधिकाऱ्यांनी बदलीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:35 IST2025-06-23T13:34:38+5:302025-06-23T13:35:03+5:30

Amravati : आयएएस, आयपीएसच्या बदल्या जोरात, मात्र भारतीय वन सेवेतील अधिकारी प्रतीक्षेत

Where is the file for 'IFS' transfers stuck? Forest officers waiting for transfers | 'आयएफएस' बदल्यांची फाइल अडली कुठे ? वनअधिकाऱ्यांनी बदलीची प्रतीक्षा

Where is the file for 'IFS' transfers stuck? Forest officers waiting for transfers

गणेश वासनिक 
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
राज्यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला असताना, भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र अद्यापही रखडलेल्या आहेत. सुमारे ५० ते ५५ आयएफएस अधिकारी बदली पात्र असताना मंत्रालयात ही फाइल कुठे अडली की कोणी अडवून ठेवली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. बदली समितीची बैठक झाल्यानंतरही 'आयएफएस'ला नवीन जागेवर पोस्टिंग दिले गेले नाही, हे विशेष.


आयएफएस बदल्यांसाठी संबंधित समितीची बैठक झाल्याची माहिती असून, नव्या नियुक्त्यांसाठी यादीदेखील तयार करण्यात आली आहे. मात्र, ही यादी अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात का पाठवण्यात आली नाही, याचे गूढ कायम आहे. शालेय वर्ष सुरू झाल्यामुळे अनेक आयएफएस अधिकारी स्वतःच्या कुटुंबासोबत स्थायिक होण्याच्या अपेक्षेने नवीन पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. काही अधिकारी मंत्रालयात वारंवार चकरा मारून थकले असून, काहींनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन बदल्यांच्या विनंती केल्याचे समजते. एकंदरीत 'आयएफएस' यांच्या रखडलेल्या बदल्यांनी वन मंत्रालय प्रकाश झोतात आले आहे.


'शिरीष' यांचे नियुक्ती परवानगीविनाच कामकाज

  • मुख्यमंत्री कार्यालयातून सात मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्त्तीला परवानगी दिली नाही.
  • असे असताना नवी मुंबई महापालिकेतील 'शिरीष' नामक एक अभियंता वनमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून कारभार जोरात हाकत आहेत.
  • 'शिरीष' यांची खासगी सचिव म्हणून नियुक्तीसाठी सीएमओ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे, परंतु परवानगी मिळाली नसतानाही 'शिरीष' यांनी मंत्रालय ते नवी मुंबई महापालिका, असा दुहेरी कारभार चालविला आहे.

'आयएफएस' यांच्या बदल्यांसंदर्भात वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.


आज सीएमओ कार्यालयाकडे फाइल जाण्याचे संकेत

  • वन विभागातील 'आयएफएस' यांच्या रखडलेल्या बदल्यांची फाइल सोमवार, २३ जून रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविली जाणार असल्याचे संकेत आहेत.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आठवड्यात विदेश दौऱ्यावर जात असल्यामुळे 'आयएफएस' यांच्या बदली फाइलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने वन मंत्रालयाने लगबग चालविल्याची विश्वसनीय माहिती आहे.
  • ५० ते ५५ आयएफएस यांच्या बदल्या ॐ होणार आहेत, तर २७ नवीन 'आयएफएस' अवॉर्डप्राप्त 'डीसीएफ' यांची मुंबईवारी जोरात आहे.

Web Title: Where is the file for 'IFS' transfers stuck? Forest officers waiting for transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.