अमरावती जिल्ह्यातील ग्रा.पं. च्या सार्वत्रिक अन् पोटनिवडणूक केव्हा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:06 IST2025-06-10T15:05:28+5:302025-06-10T15:06:07+5:30

Amravati : २६ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, गावागावांत निवडणुकीची प्रतीक्षा

When will the general and by-elections of Gram Panchayats in Amravati district be held? | अमरावती जिल्ह्यातील ग्रा.पं. च्या सार्वत्रिक अन् पोटनिवडणूक केव्हा होणार?

When will the general and by-elections of Gram Panchayats in Amravati district be held?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
जिल्ह्यात ४ ग्रापंमध्ये सार्वत्रिक, ६ मध्ये थेट सरपंच व १२५ ग्रापंमध्ये अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी २६ मार्चला करण्यात आली. निवडणूक आयोगाचे प्रचलित निकषानुसार अंतिम यादीच्या प्रसिद्धीनंतर लगेच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. या वेळी मात्र अडीच महिन्यापासून कार्यक्रम जाहीर न झाल्याने इच्छुकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.


मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच रिक्त थेट सरपंचपद व सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारा मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात आला व या कार्यक्रमानुसार २६ मार्च २०२५ रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांद्वारा करण्यात आली. त्यामुळे लगेच निवडणूक जाहीर होण्याची अपेक्षा या गावांमध्ये होती. प्रत्यक्षात आतापर्यंत आयोगाद्वारा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावात आता वेगवेगळ्या चर्चा होत आहे.


या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक
वरुड तालुक्यात जरुड व शहापूर, अचलपूरमध्ये खेलदेवमाळी व चिखलदरा तालुक्यात रुईपठार या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. शिवाय आखतवाडा, वणी ममदापूर, खोलापूर, सर्फापूर व अन् दोन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचासाठी पोटनिवडणूक व अन्य १२५ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त १८९ सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा होत आहे.

Web Title: When will the general and by-elections of Gram Panchayats in Amravati district be held?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.