शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

'कुत्ता खाने की पुलिस कम्प्लेंट की थी क्या?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:29 IST

'कुत्ता खाने की पुलिस कम्प्लेंट की थी क्या?' असे प्रश्न वसतिगृहातील परप्रांतीय विद्यार्थी मुद्दामच श्रीनाथवाडीवासीयांना विचारत आहेत.

ठळक मुद्देपोलीस संथ : 'त्या' विद्यार्थ्यांची वाढली हिम्मत

अमरावती : 'कुत्ता खाने की पुलिस कम्प्लेंट की थी क्या?' असे प्रश्न वसतिगृहातील परप्रांतीय विद्यार्थी मुद्दामच श्रीनाथवाडीवासीयांना विचारत आहेत. तक्रारीनंतरही करवाई न केल्याने त्या विद्यार्थ्यांची हिम्मत वाढल्याचेच हे द्योतक आहे.श्रीनाथवाडीतील श्वानचोरी, श्वानहत्या आणि श्वानभक्षणाचा गंभीर मुद्दा राजापेठ पोलिसांसाठी क्षुल्लक ठरला आहे. या प्रकरणाचा तपास ज्या संथगतीने सुरू आहे, त्यावरून श्रीनाथवाडीतील नागरिकांना आता पोलीस प्रशासनाच्या प्रामाणिकतेवरच संशय निर्माण झाला आहे.कारवाई न झाल्याने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांचे मनसुबे बळकट झाले आहेत. अनेक वर्षांपासून सातत्याने त्रास होऊनही श्रीनाथवाडीतील रहिवासी उघडपणे पोलीस तक्रार करीत नव्हते. यावेळी ती केली; परंतु तक्रारीला पोलीस प्रशासनाकडून आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडून गांभीर्यपूर्वक प्रतिसाद मिळाला नाही. नियम, शिस्त, कायदा, लोकाधिकार हे केवळ शोभेचेच शब्द असल्याच्या प्रतिक्रिया त्यामुळेच त्रस्त रहिवासी आता व्यक्त करीत आहेत.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी या प्रकरणाची जातीने दखल घेऊन श्वानहत्येचे आरोपी शोधून काढावे, वगळण्यात आलेल्या श्वानचोरीच्या कलमांतर्गतही गुन्हे दाखल करावे, अशी मागणी प्राणीप्रेमी संघटनांची आणि जागृक नागरिकांची आहे.प्रभाकररावांच्या घोषणेचे काय?श्वानचौर्य, श्वानहत्या आणि श्वानभक्षण करणाºया आमच्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांना निलंबित करू, असे अश्वासन प्रभाकरराव वैद्य यांनी दिले होते. आठवडा उलटला मात्र प्रभाकररावांनी अमरावतीकरांना दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरविले नाही. वेळ मारून नेण्यासाठी तर असे आश्वासन देण्यात आले नव्हते ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.