शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

है क्या अमरावती! काळी-पिवळी, ऑटोनेही प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. परिणामी ऐन दिवाळीत प्रवाशांची कुचंबणा सुरू आहे. परतवाडा-अमरावती हा मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा आहे. या मार्गावर धावणाऱ्या १००पेक्षा अधिक बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे दोन हजारांहून अधिक प्रवाशांची कुचंबणा रोजची सुरू आहे, तर  महत्त्वाचे काम करण्यासाठीच नागरिक कोरोनाकाळाप्रमाणे बाहेर पडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राज्यभर एस. टी. महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. जिल्ह्यातील सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा मार्ग परतवाडा - अमरावती यावर दामदुप्पट रकमेत मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना जावे लागत असल्याचे चित्र मागील चार दिवसांपासून आहे. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. परिणामी ऐन दिवाळीत प्रवाशांची कुचंबणा सुरू आहे. परतवाडा-अमरावती हा मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा आहे. या मार्गावर धावणाऱ्या १००पेक्षा अधिक बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे दोन हजारांहून अधिक प्रवाशांची कुचंबणा रोजची सुरू आहे, तर  महत्त्वाचे काम करण्यासाठीच नागरिक कोरोनाकाळाप्रमाणे बाहेर पडत आहेत.

दामदुप्पट रकमेत मिळेल त्या वाहनाने प्रवास परतवाडा-अमरावती व इतर मार्गांवर कालपर्यंत काळी-पिवळी व खासगी बस  धावत होत्या. मात्र, एसटी बसचालक-वाहक व आगार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तीनचाकी ऑटोरिक्षांनीही नागरिक प्रवास करत असल्याचे चित्र आहे. परतवाडा - अमरावती प्रवास भाडे शंभर रुपये घेतले जात आहेत. काळी-पिवळी कालपर्यंत चाळीस रुपये घेत असताना, आता ६० रुपये, तर खासगी बस ५० रुपयांवरून थेट ८० रुपयांवर प्रवास भाडे घेत आहेत.

बसस्थानकापुढेच रांगापरतवाडा बसस्थानकापुढे खासगी प्रवासी वाहून नेणाऱ्या बसगाड्या, काळी-पिवळी, ऑटोरिक्षा अमरावती मार्गावर इतर ठिकाणी जाण्यासाठी लागत आहेत. दुसरीकडे परिवहन महामंडळाचे चालक-वाहक कर्मचारी संपावर असून, त्यांच्या बसगाड्या कुलूपबंद आहेत.

बाजारपेठेवरील परिणामनजीकच्या तीन-चार तालुक्यांसाठी परतवाडा मोठी बाजारपेठ आहे. येथे आदिवासी पाड्यासह अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी तालुक्यांमधील ग्रामीण भागातील नागरिक येतात. परंतु, बस बंद असल्याने बाजारपेठसुद्धा दिवाळीनंतर शांत दिसून आली.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप