सुरईच्या वापराने टळू शकतात जलजन्य आजार
By Admin | Updated: July 7, 2015 00:06 IST2015-07-07T00:06:32+5:302015-07-07T00:06:32+5:30
सुरईतील नळाद्वारे पाणी पिणे शाळकरी मुलांच्या दृष्टीने योग्य ठरते,

सुरईच्या वापराने टळू शकतात जलजन्य आजार
विद्यार्थ्यांसाठी उपयोगी : सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे ‘डब्ल्यूएचओ’ला पत्र
वैभव बाबरेकर अमरावती
सुरईतील नळाद्वारे पाणी पिणे शाळकरी मुलांच्या दृष्टीने योग्य ठरते, असे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने जागतिक आरोग्य संघटनेला पाठविले आहे. त्यांनी ५० कुटुंबांतील शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण केले असता शाळकरी मुलांवर दूषित पाण्याचा प्रभाव पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील १२ ते १३ शाळा निवडून लहान मुलांच्या व्यवहाराकडे लक्ष दिले. त्यामध्ये शाळेतील मुले पाणी पिताना माठात हात बुडवून पाणी पीत असल्याचे लक्षात आले. पाण्यात हात बुडवीत असल्यामुळे माठातील पाणी दूषित होत आहेत आणि तेच पाणी शाळकरी मुले पीत असल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले.
विभागाने जिल्ह्यातील ५० कुटुबांतील शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत चौकशी केली आहे. त्यामध्ये बहुतांश मुलांना सर्दी, ताप, डायरिया व खोकला आदी आजार आढळून आले आहेत. पुर्वीच्या काळात सुरळीतून पाणी पिण्याची पध्दत होती. मात्र आता ती लोप पावली आहे. अनेक शाळेनी ती पध्दत मोडित काढली असून आता वॉटर प्यूरिफाय किंवा केवळ पाण्याचे माठचा मुलांसाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे लहान मुले जेवणाचा डब्बा खाल्यावर पाणी पिताना सरळ ग्लास माठात बुडवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शाळेत ४० टक्के विद्यार्थ्यांवर दूषित पाण्याचा प्रभाव पडत असल्याचे लश्रात आले आहेत. त्यामुळे शाळेमध्ये सुरळीतून पाणी पिण्याची पध्दत सुरु करण्यात यावी अशी मागणी सुक्ष्मजीव शास्त्र विभागाने आरोग्य संघटनेला कळविले आहे. त्यातच मुलांना जेवताना चमच्याची सवय लावण्याच्या सुचना शाळेला देण्यात आल्या आहेत. शाळेतील मुलांना सुरळीतील पाणी पिण्याची सवय लावल्यास त्यांच्या आरोग्याच्या ३० ते ४० टक्के तक्रारी कमी होण्याचा दावा सुक्ष्मजीव शास्त्र विभागाने केले आहे.
लोणार सरोवरात आढळले अतिदुर्मीळ बॅक्टेरिया
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पाण्यात अतिदुर्मीळ प्रजातीचे बॅक्टेरिया आढळून आले आहेत. त्यावर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रयोग शाळेत संशोधन सुरु आहे, अशी माहिती विभागप्रमुख दी.हो. तांबेकर यांनी दिली.
हागणदारीमुक्त ५० गावांतील पाणी शुध्द
१०० हागणदारी मुक्त गावाची तपासणी करण्यात आली. जे ५० गावे हागणदारीमुक्त नाहीत. तेथील पाणी दूषित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेकडून सूक्ष्मजीव विभागाने यादी मागविली असून तेथील पाण्याचा दर्जा तपासण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे. ७० टक्के रोग हे दूषित पाण्यामुळे होताच, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचा आहे.
जिल्ह्यातील १२ शाळा निवडून मुलांच्या पाणी पिण्याच्या सवयीकडे लक्ष देण्यात आले. त्यामध्ये ५० कुटुबांंतील मुले दूषित पाण्यामुळे आजारी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुलांचा पाणी पिताना पाण्यात हात जाऊ नये. याची खबरदारी घेण्यासाठी शाळेत सुरईचा उपयोग करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेलाही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
-दि.हो.तांबेकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख.