शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील एकझिरा येथे टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST

फोटो पी १६ एकझिरा चिखलदरा : उन्हाळ्याची चाहूल लागताच मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. ...

फोटो पी १६ एकझिरा

चिखलदरा : उन्हाळ्याची चाहूल लागताच मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. यंदाचा पहिला टँकर तालुक्यातील चिखलदरा तालुक्यातील एकझिरा गावात ११ मार्चपासून सुरू झाला. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील ३० पेक्षा अधिक गावांत भीषण टंचाईची शक्यता वर्तविली जात आहे

जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होतो. डोंगरदऱ्यांतील उंच-सखल भागात वसलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हातपंप आणि विहिरीच्या पाण्याची पातळी खालावते. दुसरीकडे नदी-नालेसुद्धा कोरडे पडू लागत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होतो. गतवर्षी ३० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. यंदा त्यापेक्षा गंभीर होण्याची शक्य वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे.

बॉक्स

हातपंपाावर १५० गावांची मदार

चिखलदरा तालुक्यात १५० पेक्षा अधिक गावांत ३७१ हातपंप आहेत. पैकी १७ हातपंप निकामी झाले असून, ३५४ चालू स्थितीत असल्याची सरकारी नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक हातपंप पाण्याची पातळी खोल गेल्याने कोरडे पडू लागल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यासाठी एकच दुरुस्ती पथक असल्याने दीडशेपेक्षा अधिक गावांत पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागते. टँकरचा प्रस्ताव येताच प्रशासनाने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी आदिवासींची मागणी आहे.