शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

राज्यातील ‘पाणी’ महागले; १ फेब्रुवारीपासून नवे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 4:22 PM

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी नवे दर जाहीर केले आहेत.

ठळक मुद्देसात वर्षांनंतर झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी नवे दर जाहीर केले आहेत. पाण्याच्या दरात सात वर्षांनंतर वाढ करण्यात आली असल्याने त्याचा फटका पाणीपट्टी भरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वसामान्य नळधारकांना सोसावा लागणार आहे. ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंत नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. ११ जानेवारीला याबाबत विस्तृत आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जाहीर केला.यापूर्वी प्राधिकरणाने ३० मे २०११ रोजीच्या आदेशाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी क्षेत्रातील पाणी वापरासाठीचे ठोक जलदर निश्चित केले होते. हे दर रबी हंगाम २०१०-११ पासून म्हणजेच १५ आॅक्टोबर २०१० पासून लागू करण्यात आले होते. यानंतर पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. दरम्यानच्या काळात महागाई निर्देशांकामध्ये ६३ टक्यांनी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने जलदर निश्चित करण्यात आलेत.नव्या जलदरानुसार ग्रामपंचायतींसाठी प्रतिहजार लिटरमागे १३.२ पैशांवरून १५ पैसे, नगरपालिकांसाठी १५.८ पैशांवरून १८ पैसे, महापालिकांसाठी २१ पैशांवरून २५ पैसे इतकी दरवाढ करण्यात आली आहे. शीतपेये, ब्रेवरी (आसावणी), मिनरल वॉटरसह अन्य औद्योगिक वापरांसाठी १६ रूपयांवरुन १२० रुपये अशी सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. नव्या जलदरानुसार थकीत पाणीपट्टीवर दर साल दर शेकडा १० टक्के दराने दंड आकारणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले आहेत.महापालिकांना १३५ लिटर दरडोई पाणीमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नव्याने ठरविलेल्या पाणीवाटप धोरणानुसार आता ५० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकांना दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठ्याची मर्यादा आखून दिली आहे. ग्रामपंचायतींना ५५ लिटर, ‘क’ वर्ग नगरपालिका व नगरपंचायतींना ७० लिटर, ‘ब’ वर्ग नगरपालिकांना १०० लिटर, ‘अ’ वर्ग नगरपालिकांना १२५ लिटर, तर ५० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकांना १५० लिटर दरडोई पाणी वापर करता येईल.पाणीवाटप संस्थेला २५ टक्के सवलतमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या पाणी वितरण धोरणानुसार शेतकऱ्यांनी पाणीवाटप संस्था स्थापन केल्यास, त्यांना २५ टक्के सूट मिळणार आहे. कृषी उद्योगासह सूक्ष्म सिंचनासाठी पाणीदरात २५ टक्के प्रोत्साहनात्मक सवलत मिळणार आहे. शेती व घरगुती वापराच्या पाणीपट्टी दरात १७ टक्यांनी वाढ करण्यात आली आहे. औद्योगिक वापरासाठीच्या पाणीदरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Waterपाणी