शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साहेब आले विहीर भरली साहेब गेले अन् कोरडी पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:09 IST

Amravati : भरउन्हात दुपारी तीन वाजता भरतात महिला विहिरीतून गढूळ पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : मेळघाटातील कुपोषणानंतर खडीमलचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशपातळीवर पोहोचला. व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक नियमाने येथील पाणीपुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात दुपारी तीन वाजता आदिवासी महिलांना सर्व कामे चातकासारखी पिण्याच्या पाण्याची वाट पाहावी लागते.

जिल्हा प्रशासनातील साहेब आले आणि त्यादिवशी विहीर तुडुंब भरली. पाठ फिरवतात रिकामी पडल्याचा अनुभव गावकऱ्यांना आला असून गढूळ पाणी दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनही गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता, कडक उन्हात एकीकडे सर्वजण कुलर पंखा एसीमध्ये झोपले असतात तर खडीमल येथे महिला, मुले विहिरीतून हंडाभर पाण्यासाठी दिवसभर राबत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे दावे फोल ठरल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राहुल येवले यांनी केला आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईची दाहकता वाढत असतांना शासन- प्रशासनाद्वारा गांर्भियाने घेतल्या जात नसल्यानेच पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचा आरोप येथीळ आदिवासी बांधवांनी केला आहे.

साहेब आले विहीर भरली...जिल्हा प्रशासनातील साहेबांनी चार दिवसांपूर्वी खडीमल गावात वस्तुस्थिती पाहण्यासाठी भेट दिली. त्याच दिवशी विहीर भरली होती. मात्र लगेच दुसऱ्या दिवसापासून विहीर कोरडी पडली. टैंकरने टाकलेले पाणी ही क्षणातच बेपत्ता होत असल्याने बुड लागलेल्या विहिरीतच बकठीण आदिवासी मनी काढत असल्याचे चित्र आहे.

शुद्ध नव्हे गढूळ पाणी....येथून टँकरद्वारे विहिरीत टाकण्यात येणारे पाणी पूर्णतः गढूळ अशुद्ध आहे. परंतु तेथे शुद्ध पाणी दिले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला आहे वास्तव काही वेगळेच आहे, प्रत्येकजण पिण्यासाठी विहिरीचे गढूळ पाणी नेत आहे. १५ किमी अंतरावरून माडीझडप येथून दोन-तीन टँकरने पाणी आणले जात आहे.

माडीझडप येथून पाणी, सोलर बंदखडीमल गावात माडी झडप या १५ किलोमीटर अंतरावरून सोलरद्वारे असलेल्या बोअरवेलमधून पाणी टँकरद्वारे आणल्या जाते परंतु ढगाळ वातावरणाने सोलर काम करीत नसल्यामुळे शनिवार, रविवार दोन दिवस पाण्यासाठी ताटकळत राहावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

टॅग्स :MelghatमेळघाटChikhaldaraचिखलदराTrible Development Schemeआदिवासी विकास योजना