शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

अचलपूर-परतवाड्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:00 AM

जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.

ठळक मुद्देनळाची धार बारीक । गळतीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर - परतवाडा शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यात नळाची धार बारीक असून काही भागात नळातून पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.अचलपूर नगर पालिकेकडून जुळ्या शहराला चंद्रभागात धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान जुळ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला लिकिजेसमुळे ठिकठिकाणी गळती लागली आहे. मात्र, नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कारण पुढे करीत लिकिजेस, गळती थांबवायला नगरपालिका तयार नाही.जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शहरांतर्गत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरही लिकिजेस आहेत. हे पाईप तुटल्याने शहरात सर्वत्र पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.दूषित पाणीपुरवठाअथक प्रयत्नानंतर नागरिकांना दोन चार बकेटा पाणी मिळते, तेही दूषित आहे. पाईप लाईनला गटारात लिकेजेस आहेत. त्यामुळे नाल्यातील, गटारातील, दूषित पाणी त्या पाईप लाईनमध्ये शिरून ते नागरिकांना नळाद्वारे मिळत आहे. चंद्रभागेच्या पाण्यासोबतच जवळपास १६ ट्यूबवेलचे थेट पाणी पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमधून सोडले जात आहे. या ट्युबवेलमधील पाण्यावर शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. दूषित पाणी शहरवासीयांना पुरविले जात आहे.अतिरिक्त पाण्याची उचलचंद्रभागा धरणातून पाणी घेताना ज्या मीटरद्वारे अचलपूर नगरपरिषद पाणी घेते ते मीटर अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याची दुरुस्ती अद्याप नगरपरिषदेने केलेली नाही. बंद मीटर बदलविले नाही. नेमक्या या बंद मीटरचा फायदा घेत नगरपालिकेने त्या धरणातून मंजूर पाण्यापेक्षा अतिरिक्त पाण्याची उचल केली आहे. ही बाब पाटबंधारे विभागाने नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिली असून, मीटर दुरुस्तीबाबत नगररिषदेला पत्रही दिले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाने या घटनेला गांभीर्याने घेतल्यास भविष्यात शहरातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई