शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जलव्यवस्थापन समितीत पाणीपुरवठ्यावर घमासान

By admin | Updated: November 15, 2014 01:12 IST

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध ...

अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरून आयोजित करण्यात आली होती. या सभेत पाणीपुरवठा आणि सिंचन विभागाच्या प्रश्नावर चांगलेच घमासान झाले. जिल्हा परिषद जलव्यस्थापन समितीच्या सभेत जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना आणि अपूर्ण असलेल्या योजना तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सभेत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत जलस्वराज योजनेचा टप्पा क्र. २ सुरू होत आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील जुना धामणगाव, अजंनगाव सुर्जी, मंगरूळ दस्तगीर, जरूड या गावांची प्रायोगिक तत्त्वावर आदी गावात जलस्वराज योजनेची कामे केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्र्वेता बॅनर्जी यांनी सभागृहात दिली. सिंचन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारा, साठवण बंधाऱ्यांची कामांसंदर्भात सभागृहात या विभागाचे कार्यकारी अभियंता यू. जे. क्षीरसागर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. जव्यवस्थापन समितीच्या सभेत शासनाकडून पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेला प्रोत्साहन अनुदानाचा निधी उपलब्ध असताना या अनुदानासाठी जिल्ह्यातील अमरावती पंचायत समिती वगळता एकाही पंचायत समितीने प्रस्ताव सादर केला नसल्याचा प्रकार 'लोकमत'ने उजेडात आणताच लोकमतचा पुरावा देत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचा काय पाठपुरावा केला आहे याची माहिती पुढील सभेत देण्याची सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, बांधकाम सभापती गिरीश कराळे, महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, कृषी सभापती अरूणा गोरले, समाज कल्याण सभापती सरिता मकेश्र्वर सदस्य सदाशिव खडके अरूणा गावंडे कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा श्र्वेता बॅनजी, कार्यकारी अभियंता सिंचन यू. जे. क्षीरसागर, उपविभागीय अभियंता आनंद दासवत, संदीप देशमुख, दीपक डोंगरे, प्रदीप ढेरे, भगवंत इश्र्वरकर, येवले यांच्यासह पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता आदी उपस्थित होते.