शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात जलसंकट गडद : ५२ तालुक्यांतील भूजलपातळीत २० फुटांपर्यंत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 17:25 IST

सरासरीपेक्षा कमी पावसाने यंदा अमरावती विभागातील ५६ पैकी ५२ तालुक्यांतील भूजलपातळी २० फुटांपर्यंत घटली आहे.

  - गजानन मोहोड 

अमरावती - सरासरीपेक्षा कमी पावसाने यंदा अमरावती विभागातील ५६ पैकी ५२ तालुक्यांतील भूजलपातळी २० फुटांपर्यंत घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी अखेरीस ६८० निरीक्षण विहिरींतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या व त्याआधारे पाच वर्षांच्या तुलनात्मक नोंदीद्वारे हे निरीक्षण नोंदविले आहे. पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८ व वाशिम जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस कोसळला. त्यामुळे ५२ तालुक्यांत भूजलपातळी २० फुटापर्यंत घटली आहे. भूजलाचे पुनर्भरण पुरेसे न झाल्याने या तालुक्यांमध्ये ही स्थिती ओढवली. तथापि, यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत एक मीटरपर्यंत पाणीपातळीत वाढ झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, ५६ तालुक्यांपैकी २६ तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत, २० तालुक्यांमध्ये दोन मीटरपर्यंत व सहा तालुक्यांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे. अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये भूजलात तूट आढळून आलेली आहे.

बसाल्ट खडकाने भूगर्भात पाणी साठवण क्षमता कमीविभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणी साठवण क्षमता कमी आहे. मात्र, यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडी फार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्र्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, या साठ्यातून सिंचन, औद्योगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे. तालुक्यांची स्थिती गंभीरविभागात भूजलात सर्वाधिक ७.८३ मीटरने घट अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात आलेली आहे. अकोट ४.०८ व बाळापूर ३.४६, अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात ५.९८, चांदूर बाजार ४.१८, दर्यापूर ३.८५ मीटर, तर उर्वरित तालुक्यात दोन मीटरपर्यंत तूट आलेली आहे. याव्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, महागाव, मारेगाव व आर्णी या तालुक्यात भूजल पातळी सरासरीइतकीच स्थिर आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भ