अमरावतीकरांची पाणीचिंता वाढली; ऊर्ध्व वर्धात ६३ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:59 IST2025-02-20T11:58:30+5:302025-02-20T11:59:30+5:30

Amravati : ४८ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये सद्यःस्थितीत ५६.६९ टक्के साठा.

Water concerns of Amravati residents increase; 63 percent water storage in Urdhva Wardha | अमरावतीकरांची पाणीचिंता वाढली; ऊर्ध्व वर्धात ६३ टक्के जलसाठा

Water concerns of Amravati residents increase; 63 percent water storage in Urdhva Wardha

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती:
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्याने पाण्याची मागणी व वापर वाढला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील मुख्य ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ६३ टक्के जलसाठा असल्याने प्रशासनासह सर्वांचीच चिंता वाढली आहे.


धरणात १,०४७ द.ल.घ.मी. पाणीसाठ्याची क्षमता
जिल्ह्यातील लहान-मोठ्या ५६ प्रकल्पांत १०४७.३० द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता आहे. यात ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ५६४.०५ द.ल.घ.मी., मध्यम ७ प्रकल्पात २५६.२४ द.ल.घ.मी. व ५६ लघुप्रकल्पांत २२७.०१ द.ल.घ.मी पाण्याची साठवण क्षमता आहे


अमरावती जिल्हास्थिती

  • ५६ एकूण प्रकल्प आहेत. यामध्ये मोठे प्रकल्प १, मध्यम ७ व लघुप्रकल्प ४८ आहेत.
  • ६० टक्के जलसाठा, या सर्व प्रकल्पांत सहाः स्थितीत सरासरी ६०.७३ टक्के जलसाठा आहे.
  • ५९ टक्के गतवर्षी जलसाठा, या सर्व प्रकल्पांत गतवर्षी याच तारखेला ५९.८५ टक्के साठा होता.
  • ६३८ द.ल.घ.मी., आजचा उपयुक्त जलसाठा व १,०४७ द.ल.घ.मी. प्रकल्पीय उपयुक्त साठा आहे.

Web Title: Water concerns of Amravati residents increase; 63 percent water storage in Urdhva Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.