स्वच्छता कामगारांचे पाय धुवून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:02 IST2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:02:06+5:30

जागतिक संकट असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्व स्तरावर लढा देण्याची प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. यामध्ये काहींच्या कार्याची दखल घेतली जाते. काही सैनिक मात्र आपले काम अव्याहतपणे करीत असतानाही दुर्लक्षित राहतात. कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या या युद्धामध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आपल्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता सकाळपासून सहभागी होतात.

Washing workers' feet are welcome | स्वच्छता कामगारांचे पाय धुवून स्वागत

स्वच्छता कामगारांचे पाय धुवून स्वागत

ठळक मुद्देकोरोना वॉरिअर्स : प्रभाग २१ मधील नागरिकांची सामाजिक जाणीव


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी शहराची स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची आहे. यासंदर्भात सामाजिक जाण ठेवून बडनेराच्या जुनीवस्ती येथील प्रभाग २१ मधील नागरिकांनी बुधवारी सफाई कामगारांचे पाय धुवून त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून स्वागत केले व कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.
जागतिक संकट असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्व स्तरावर लढा देण्याची प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. यामध्ये काहींच्या कार्याची दखल घेतली जाते. काही सैनिक मात्र आपले काम अव्याहतपणे करीत असतानाही दुर्लक्षित राहतात. कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या या युद्धामध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आपल्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता सकाळपासून सहभागी होतात. कधी मास्क आहे, तर कधी नाही. ग्लोव्ह्ज, संरक्षक बूट आदी साधने फार दूरची गोष्ट; मात्र याची कुठलीही तमा न बाळगता हा घटक यामध्ये सहभागी झालेला आहे. याची दखल घेत सामाजिक जाणिवेचा परिचय देत बडनेरा येथील बारीपुऱ्यातील बजरंग बली मंडळ व खाटीकपुºयातील नवदुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रवि संगते, हीरा संगते, किशोर संगते, अन्नपूर्णा मारवे, जगदीश उसरे, नीलेश बिºहा, उषा उसरे, रोशनी संगते, प्रिया बग्गन, आरोग्य निरीक्षक एम.के. उसरे यांचा सत्कार करीत कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Washing workers' feet are welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.