शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...रस्त्यावर फिरताहेत 'गॅस बॉम्ब'

By admin | Updated: May 11, 2016 00:33 IST

चारचाकी वाहनात अनधिकृतपणे गॅस कीट बसवून शासनाकडून अनुदानावर मिळणाऱ्या घरगुती गॅसचा वापर करून सफर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

अनधिकृत गॅस कीट : घरगुती गॅस रिफिलिंगची अनेक ठिकाणेअंजनगाव सुर्जी : चारचाकी वाहनात अनधिकृतपणे गॅस कीट बसवून शासनाकडून अनुदानावर मिळणाऱ्या घरगुती गॅसचा वापर करून सफर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कमी खर्चाच्या लाभापायी आता सर्रास वापर होत असल्याने रस्त्यावर गॅस बॉम्ब फिरत असल्याची ही अवस्था आहे. याचा ज्वलंत प्रकार बुधवारी स्थानिक पंचायत समितीसमोर अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. कंपन्याकडून अधिकृत गॅस कीटच्या गाड्या बनविताना इंजीन व्यवस्थेपासून तर सुरक्षेच्या सर्व बाबी तपासून सदर व्यवस्था केली जाते. शिवाय सी.एन.जी गॅस सुविधेसाठी गॅस पंपची व्यवस्थासुद्धा जवळपास सर्वच जिल्हास्थळी आहे. परंतु आज ग्रामीण भागात पैसे वाचविण्यासाठी अनेक जन आपल्या पेट्रोल किंवा डिझेल गाड्या चालवत आहेत. शिवाय शासनाच्या अनुदानावर गॅस सिलिंडर या गाड्यांच्या टाकीमध्ये गॅस भरून देणारे ठिकाणेसुद्धा ग्रामीण भागात तयार झाल्याने सर्रासपणे गॅस कीटची वाहने रस्त्यावर फिरत आहेत. अंजनगावात बुधवारी पंचायत समिती समोर झालेल्या स्फोटानंतर या प्रकाराची शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. (प्रतिनिधी)४०० रुपयांत ३०० किलोमीटरशासनाच्या अनुदानावर प्राप्त होणाऱ्या ४०० रुपयाच्या एका सिलिंडरच्या गॅसवर सुमारे ३०० की.मी चा प्रवास होतो. त्यामुळे मोठी कमाईच्या लालसेपोटी वैयक्तिक वाहनधारक तथा खासगी वाहतुकीचा व्यवसाय करणारे अशा अनधिकृत गॅसकीट बसविलेल्या वाहनांचा सर्रास वापर होत असलेल्या या प्रकारावर तपासणी व कारवाई गरजेचे असल्याचे बोलले जाते.कारवाई केली जाईलपंचायत समितीसमोर घडलेल्या आगीच्या प्रसंगाची पोलिसांकडे कुठलीही तक्रार प्राप्त नसून मालमत्ता हानी झालेलेसुद्धा पोलिसांपर्यंत आले नाही. परंतु सार्वजनिक हित लक्षात घेता घडलेल्या प्रकाराबाबत सखोल चौकशी केली जाईल. अनधिकृत प्रकार आढल्यास कारवाईसुध्दा केली जाईल, असे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी सांगितले.मुंबई बाजारातील वाहने ग्रामीण भागात मुंबई येथून केवळ ५० ते ६० हजारांत मिळणाऱ्या टकाटक चारचाकी वाहने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात येत असून या गाड्यांमध्ये अपूर्ण तांत्रिक कौशल्य असलेल्या कारागिरांकडून अनधिकृतपणे गॅसकीट बसवून प्रवासी व्यवसायासाठी वापर होत असल्याचे प्रमाण वाढले आहे.