१० व ११ रोजी पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 08:31 PM2020-08-08T20:31:57+5:302020-08-08T20:32:17+5:30

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Warning of heavy rains in East Vidarbha on 10th and 11th | १० व ११ रोजी पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

१० व ११ रोजी पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
नैऋत्य (उत्तर)दिशेकडून मोसमी वारे दक्षिणेकडे वाहिल्यास संथ गतीने पाऊस पडतो. तेव्हाच झडसदृश स्थिती राहते. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे दक्षिणेकडून मोसमी वारे ५ ते ६ किमी उंचीवरून वाहू लागल्याने कुठे धो-धो तर कुठे काहीच नाही, अशी स्थिती उदभवत आहे. त्यामुळे यंदा झडसदृश स्थिती अनुभवता आली नाही, अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली.
ईशान्य बंगालच्या उपसागरात ३.५ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात रविवारी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. सद्यस्थितीत अरबी समुद्र, गुजरात व मध्यप्रदेशवर कमी दाबाचा पट्टा असल्याने तेथे संथपणे पाऊस कोसळत आहे.

सध्या अरबी समुद्रातून नैरूत्य मोसमी वारे सशक्तपणे वाहत असून हा प्रवाह आनखी ४८ तास टिकणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १० व ११ ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
१० ते १२ ऑगस्ट दरम्यान विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास ७० टक्के भागात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात मात्र अतिवृष्टीच्या इशाºयासह १५ ऑगस्टपर्यंत विदर्भात चांगला पाऊस पडण्याची शक्यता बंड यांनी वर्तविली आहे.

 

Web Title: Warning of heavy rains in East Vidarbha on 10th and 11th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस