वरूड तालुक्याला संत्रा प्रकल्पाची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:06+5:302021-03-21T04:13:06+5:30

अनेकवेळा घोषणा संत्रा उत्पादकांची उपेक्षाचवरूड (अमरावती) : शेंदूरजनाघाट येथे अमरावती फ्रुट ग्रोवर इंडस्ट्रियल को-ऑप सोसायटी लिमिटेड नावाने संत्राचा ज्यूस ...

Wanwa of Orange Project in Warud taluka | वरूड तालुक्याला संत्रा प्रकल्पाची वानवा

वरूड तालुक्याला संत्रा प्रकल्पाची वानवा

अनेकवेळा घोषणा संत्रा उत्पादकांची उपेक्षाचवरूड (अमरावती) : शेंदूरजनाघाट येथे अमरावती फ्रुट ग्रोवर इंडस्ट्रियल को-ऑप सोसायटी लिमिटेड नावाने संत्राचा ज्यूस काढणारी फॅक्टरी १९५७ मध्ये स्थापन या प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी २७ नोव्हेंबर १९६० रोजी केले होते. तेव्हा विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधल्याने हा परिसर विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून देशात परिचित झाला. सहकारी तत्त्वावर सुरु असलेला संत्रा प्रकल्पातून देशाच्या कानाकोपऱ्यात बंगळुरू, चेन्नई, कोलकता, मुंबई, कानपूर, अमृतसरसह आदी शहरांत संत्रा ज्यूस पोहचविला १९५८ ते १९६३ सुरळीत चालविल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जावर सुरू केलेल्या प्रकल्पाला राजाश्रय मिळाला नसल्याने आर्थिक घरघर लागली आणि प्रकल्प बंद पडला. यानंतर केवळ मागण्या कायम राहिल्या. परंतु प्रकल्प मिळाला नाही. प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा संत्रा प्रकल्पाचा असायचा, यावर तालुक्याचे राजकारण सुरू आहे. १९९२ साली संत्रावर प्रक्रिया करणारी सोपेक नावाची सहकारी तत्त्वावर संत्रा प्रक्रिया प्रकल्प वरूड लगत रोशनखेडा येथे सुरू केला. परंतु काळाच्या ओघात तो बंद पडला. यानंतर तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या मागणीची दाखल घेऊन मोर्शी, वरूड मतदार संघातील संत्रा उत्पादकांसाठी नोगा शासकीय संत्रा प्रकल्प मंजूर करून मायवाडी एमआयडीसीत उभा केला. थाटात उद्घाटन पार पडले आणि बंद झाला. शेतकऱ्यांचा पुन्हा आशेचा किरण मावळला. प्रत्येक पंचवार्षिकमध्ये याच मुद्द्यावर राजकारणापलीकडे काहीच झाले नाही.

संत्रा प्रकल्पाची मागणी वाढतच राहिली आणि राजकारणी झेलतच राहिले, अशी अवस्था झाली. २०१४ मध्ये भाजपा सरकार आले, अनिल बोंडे भाजपावर निवडून आले आणि राष्ट्रीय कृषी व संत्रा परिषद १ ते ४ ऑक्टोबर २०१५ ला वरूड येथील बाजार समितीच्या प्रांगणात घेतली होती. या परिषदेला उद्घाटन प्रसंगी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी संत्रावर प्रक्रिया करण्यासाठी वरूड येथे संत्रा डिहायड्रेशन प्रकल्प तर मोर्शीला संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा डझनभर मंत्र्यासमोर झाली होती. परंतु हे आश्वासनसुद्धा हवेतच विरले.

यानंतर २४ डिसेंबर २०१७ मधे वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन सोहळ्यात केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील मिहानमध्ये पाच हजार कोटींचा संत्रा प्रकल्प स्वामी रामदेव बाबा पतंजलीच्यावतीने उभारणार असल्याने विदर्भातील संत्र्याला सुगीचे दिवस येतील, असे सांगितले होते. परंतु हा प्रकल्पसुद्धा उदयास आला नाही.

पुन्हा कोका कोलाचा प्रकल्प वरूडला होणार अशा घोषणा झाल्या आणि वरूडचा प्रकल्प मोर्शीत हिवरखेड (ठानाठुनी) येथे गेला.

२०१४ मध्या घोषणा झालेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प मोर्शीतून नांदेडला पळविला.

१० मार्च २०१२ च्या अर्थसंकल्प सादरीकरण झाले. त्यात वरूड, मोर्शीतील संत्राला भाव मिळावे म्हणून संत्रा उत्पादकांना दिलासा मिळेल, याकरिता केवळ अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प साकारण्याची दमदार घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु नेमका कुठे आणि किती आर्थिक तरतूद राहणार हे कोडेच आहे.

सर्व घोषणा गेल्या ६० वर्षांपासून हवेतच विरत असल्याची चर्चा असून शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही.

Web Title: Wanwa of Orange Project in Warud taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.