शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विनोद शिवकुमारचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहातच मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार, शिवकुमार याला ३० मार्च रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी, त्याची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कैद्याला किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन राहावे लागते. त्यानुसार विनोद शिवकुमार याला येथील अंध विद्यालयात क्वारंटाईन केले आहे. 

ठळक मुद्देचाचणी निगेटिव्ह तरी सूट कशाला? सेंट्रल जेलमध्ये रवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा अद्यापही तात्पुरत्या कारागृहातच मुक्काम आहे. त्याचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, शिवकुमार याला मध्यवर्ती कारागृहात का पाठविले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार, शिवकुमार याला ३० मार्च रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी, त्याची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कैद्याला किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन राहावे लागते. त्यानुसार विनोद शिवकुमार याला येथील अंध विद्यालयात क्वारंटाईन केले आहे. तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करून मध्यवर्ती कारागृहात पाठविणे अनिवार्य असताना व विनोद शिवकुमार याला तात्पुरत्या कारागृहात १८ दिवस झाले असतानाही जुन्या कारागृहात म्हणजे मध्यवर्ती कारागृहात रवानगी केलेली नाही. यादरम्यान दुसरी कोविड चाचणी झाली आणि तीसुद्धा निगेटिव्ह आली. तरीही शिवकुमार याला सूट कशासाठी दिली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यवर्ती कारागृहात शिवकुमार याच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर नाही. कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट, नक्षलवादी, प्रसिद्ध खुनातील आरोपी जेरबंद आहेत, हे विशेष. 

कारागृहात येणाऱ्या प्रत्येक आरोपीला समान वागणूक दिली जाते, मग तो कुणीही असो. विनोद शिवकुमार यालादेखील तशीच वागणूक दिली जात आहे. तात्पुरत्या कारागृहातील त्याचा कार्यकाळ संपला असला तरी पोलीस बंदोबस्त, सुट्यांमुळे जुने कारागृहात आणता आले नाही. सध्या शिवकुमार क्वारंटाईन आहे.- रमेश कांबळे अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाण