शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वाघांच्या तृष्णेसाठी वनविभागाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 11:42 IST

यंदा उन्हाळा अधिक तापणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देरान धगधगतेयआटत आहेत नैसर्गिक पाणवठे

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजिवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पहिल्यांदाच मार्चमध्येच नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने यावर्षी विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी जिकरीचे ठरणार आहे.राज्यातील एकूण सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात, तर सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रात आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नैसर्गिक पाणवठे पाणी आटू लागल्याने कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती युद्धस्तरावर केली जात आहे. मेळघाट, ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पात पाणीसमस्या गंभीर स्वरूप धारण करणार आहे. परिणामी काही भागात टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजनदेखील करण्यात आले. वाघांची तहान भागविताना निधीची कमतरता पडू नये, याची दक्षता वनाधिकारी घेत आहेत.रान धगधगत आहे. काही जंगलांना आगी लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे हे दोन महिने वन्यजिवांचे संरक्षण करताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.जंगलात ५ ते १० कि.मी. अंतरावर कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत. काही पाणवठ्यांवर सौरऊर्जेवर स्वयंचलित हातपंपाद्वारा पाणीपुरवठा केला जाईल. कृत्रिम पाणवठे तयार करताना प्लास्टिकचे आवरण, माती व पाणी साठवण्याची व्यवस्था राहणार आहे. हल्ली व्याघ्र प्रकल्पात विशिष्ट ठरावीक भागातच नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यामुळे वन्यजिवांची एका भागातून दुसऱ्या भागात पाण्यासाठी भटकंती होऊ नये यानुसार कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली जात आहे.

विषप्रयोगाच्या तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपरकृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोग करून वन्यजीवांची शिकार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यातील पाणी १२ तासांपेक्षा अधिक काळ साठवून राहता कामा नये. पाणवठ्यात कुणी विषप्रयोग केला असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना तांबडा लिटमस पेपरचा वापर करण्याच्या सूचना आहेत. पाणवठ्यात विष टाकले असेल, तर लिटमस पेपरचा रंग लाल होतो, या विषप्रयोग तपासणीच्या टिप्स आहेत.

वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, ही दक्षता घेतली जात आहे. व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासोबतच शिकाऱ्यांवरही लक्ष आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर.

टॅग्स :Tigerवाघ