पशुवैद्यकीय दवाखान्याचे वेळापत्रक बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:48+5:302021-01-08T04:38:48+5:30

अमरावती : पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांची सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ही बेळ बदलून यापुढे सकाळी ...

Veterinary hospital schedule changed | पशुवैद्यकीय दवाखान्याचे वेळापत्रक बदलले

पशुवैद्यकीय दवाखान्याचे वेळापत्रक बदलले

अमरावती : पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांची सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ही बेळ बदलून यापुढे सकाळी ९ ते दुपारी ४.३० या वेळेत विनाखंड पशूंना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन खात्याने ४ जानेवारी रोजी परिपत्रक जारी केले.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे १४ तालुक्यांत १०१, तर राज्य शासनाचे ६७ असे एकूण जिल्हाभरात १६८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून पशुधनाला पशुआरोग्य सेवा पुरविली जाते. आतापर्यंत हे दवाखाने दोन सत्रांत उघडत होते. यात सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत पहिला टप्पा, तर दुपारी ३ ते ५ असा दुसरा टप्पा याप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्यांची सेवा उपलब्ध होत होती. परंतु, आता पशुवैद्यकीय दवाखाने हे सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी ९ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे. यात दुपारी १ ते १.३० अशी जेवणाची सुटी राहणार आहे. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ ही वेळ राहणार आहे. पशुदवाखान्याच्या नवीन वेळापत्रकाची लवकरच अंमलबजाणी सुरू केली जाणार आहे.

कोट

शासनाच्या पशुसंर्वधन विभागाने पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळापत्रकात बदल सुचविले. नवीन वेळापत्रकासंदर्भात पशुसंर्वधन आयुक्त कार्यालयाचे आदेश प्राप्त होताच अंमलबजाणी केली जाईल.

डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Veterinary hospital schedule changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.